-
दादरमध्ये मराठीकरण समितीकडून कबूतरखाना बंदीच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलन पोलिसांनी बळाचा वापर करून पांगवलं. यावेळी जोरदार झटापट सुद्धा झाली. (सर्व फोटो सौजन्य-आकाश पाटील, इंडियन एक्स्प्रेस)
-
मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी पोलिसांनी मराठीसाठी रक्त काढल्याचा आरोप केला. तसेच हात मोडल्याचे त्यांनी म्हटलं आहे
-
गोवर्धन देशमुख म्हणाले ज्यावेळी चाकू सुऱ्या घेऊन जैन समाजाने आंदोलन केलं तेव्हा पोलीस कुठे होते? आमच्या पाठिशी लोढांसारके मंत्री नाहीत हे दुर्दैवी आहे असंही देशमुख म्हणाले.
-
मुख्यमंत्री गृहमंत्री एका विशिष्ट समाजासाठी आहेत. जर कोणी कायदा सुव्यवस्था हातात घेतली तर महामोर्चा काढणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला. ते म्हणाले की मराठ्यांमुळे हिंदुत्व जपले गेले. हा विषय धर्माचा नसून आरोग्याचा आहे.
-
एका विशिष्ट समाज धर्माचे नाव घेऊन कायदा आणि सुव्यवस्था बिघडू पाहत आहे. शस्त्रे काढू, मोर्चे काढू वगैरे भाषा करून असंतोष निर्माण करत आहेत. त्यांना वेळीच आवर घालावा अन्यथा आम्हासही प्रतिउत्तरादाखल मोर्चे काढावे लागतील असंही आंदोलकांनी यावेळी सांगितलं.
-
काही मूठभर व्यक्ती व गट यांनी जाणीवपूर्वक दादर येथील कबूतरखान्याच्या बंदिस्त फीडिंग क्षेत्राची तोडफोड करून कबुतरांना खाद्य देण्याची बेकायदेशीर कृती केली असा आरोप आंदोलकांनी केला.
-
संबंधित सर्व व्यक्ती व आयोजकांवर तत्काळ एफआयआर नोंदवावा व उच्च न्यायालय अवमान अधिनियम भारतीय दंड संहिता व मुंबई महानगरपालिका कायदे अंतर्गत कठोर कारवाई केली गेली पाहिजे असं आंदोलक म्हणाले.
-
कबुतरखान्याजवळ जमलेल्या आंदोलकांना आंदोलन सुरु करण्याआधीच पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.
-
यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजीही केली.
कबूतरखाना भागात मराठा एकीकरण समिती आक्रमक, “आमच्याकडे लोढांसारखे मंत्री नाहीत” म्हणत देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका
मराठी एकीकरण समितीने आज दादरच्या कबूतरखाना भागात आंदोलन केलं, तिथे जमण्याआधीच पोलिसांनी त्यांची धरपकड केली.
Web Title: Marathi ekikaran samiti agitation at kabutar khana mumbai what did they say