Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नेपाळ
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. mumbai rain today schools colleges shut imd issues red alert pvt office employees to work from home in photos aam

मुंबई पाण्यात आणि मुंबईकर घरात; पाहा शहराची काय झाली अवस्था

Mumbai Rain: मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे.

Updated: August 19, 2025 11:53 IST
Follow Us
  • Mumbai Rain Updates
    1/1

    भारतीय हवामान विभागाने आज मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून मुंबईत सातत्याने पाऊस कोसळतो आहे. (Photo:PTI)

  • 2/1

    या पार्श्वभूमीवर, बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा वगळता, इतर सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यालये यांना महानगरपालिकेकडून आज सुटी जाहीर करण्यात आली आहे. (Photo:PTI)

  • 3/1

    याचबरोबर मुंबई महानगरातील सर्व खासगी कार्यालये, आस्थापना यांनी आपल्या कामकाजाच्या स्वरूपानुसार, कर्मचाऱ्यांना घरी राहून कामकाज करण्याच्या आणि अनावश्यक प्रवास टाळण्याच्या सूचना देण्याचे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे आवाहन करण्यात आले आहे. (Photo:PTI)

  • 4/1

    कालपासून सातत्याने कोसळत असलेल्या पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचल्याचे दृश्य आहे. दादर हिंदमाता परिसराला याचा मोठा फटका बसल्याचे पाहायला मिळत आहे.(Photo:PTI)

  • 5/1

    पावसामुळे महापालिका प्रशासनाने शहरातील सर्व शांळांना सुट्ट्या जाहीर केल्या आहेत. याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षाही पुढे ढकलण्यात आल्या आहेत. (Photo:PTI)

  • 6/1

    उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य आपत्कालीन नियंत्रण कक्षाला भेट देत मुंबई शहर आणि परिसर तसेच राज्यातील इतर भागात मुसळधार पावसामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती घेतली आणि आवश्यक त्या सूचना केल्या आहेत. (Photo:DGIPR)

  • 7/1

    मिठी नदीच्या पाणी पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांचे स्थलांतर करण्यास प्रशासनाने सुरुवात केली आहे. (Photo:DGIPR)

  • 8/1

    पावसामुळे नालासोपाऱ्यातील काही घरांमध्ये पाणी शिरल्याचे पाहायला मिळत असून, यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. (Photo: ANI)

TOPICS
पाऊसRainमुंबईMumbaiमुंबई लोकलMumbai Localमुंबईतील पाऊसMumbai Rain

Web Title: Mumbai rain today schools colleges shut imd issues red alert pvt office employees to work from home in photos aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.