-
राज्यामध्ये राज ठाकरे व उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चा रंगत असताना मनसे प्रमुख राज ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटी वाढत आहेत. (Photo: Devendra fadanvis/X)
-
दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये राज ठाकरे यांनी शिवसेना उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशीही भेटी वाढवल्या आहेत. (Photo: Devendra fadanvis/X)
-
असं असताना, काल ३ सप्टेंबर रोजी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे. (Photo: Devendra fadanvis/X)
-
दरम्यान, यावेळी मुख्यमंत्र्यांच्या पत्नी अमृता फडणवीसही हजर असल्याचे पाहायला मिळाले. (Photo: Devendra fadanvis/X)
-
राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे बाप्पाचं दर्शन घेताना (Photo: Devendra fadanvis/X)
-
दरम्यान, यंदा गणेशोत्सवामध्ये उद्धव ठाकरेही राज ठाकरेंच्या शिवतीर्थवर बाप्पाच्या दर्शनासाठी पोहोचले होते. (Photo: Uddhav Thackeray/X)
-
तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही राज ठाकरेंच्या घरच्या गणपती दर्शनाला गेले होते. दरम्यान, आता राज ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्याचीही माहिती आहे. राज ठाकरे हे बेस्टच्या निकालांच्या दुसऱ्या दिवशी फडणवीसांच्या भेटीला गेले होते, त्यामुळे आगामी मुंबई महापालिका निवडणुकांच्या दृष्टीने या तिन्ही नेत्यांच्या भेटीगाठींना वेगळा अर्थ असल्याचं राजकीय जाणकार सांगतात. (Photo: Devendra fadanvis/X)
Ganeshotsav 2025: राज ठाकरे मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर; सपत्नीक घेतलं बाप्पाचं दर्शन, पाहा Photos
Ganeshotsav 2025 : काल ३ सप्टेंबर रोजी राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा या निवासस्थानी पोहोचले. राज ठाकरे यांनी सपत्नीक मुख्यमंत्र्यांच्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे.
Web Title: Raj thackeray visits cm devendra fadanvis varsha baunglow for ganpati darshan see photos spl