• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. uddhav thackeray dasara melava speech imp points in his speech what did he say about bjp and eknath shinde scj

“भाजपाने हिंदुत्वाचं ढोंग आणि सोंग करु नये”; उद्धव ठाकरे गरजले, दसरा मेळाव्याच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे

उद्धव ठाकरे यांनी आज दसरा मेळाव्यात घणाघाती भाषण केलं. यावेळी त्यांनी एकनाथ शिंदे, भाजपावर टीका केली.

Updated: October 2, 2025 21:35 IST
Follow Us
  • Uddhav Thackeray
    1/10

    उद्धव ठाकरेंनी भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो म्हणत केली. त्यानंतर नाव न घेता एकनाथ शिंदेंना टोला लगावला. मी आज बाळासाहेबांची शाल पांघरलेल्या गाढवाचे फोटो पाहिले असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 2/10


    मी मुख्यमंत्री असताना कोविड काळात केलेल्या कामामुळे देशात एक नंबरचा मुख्यमंत्री ठरलो होतो. पण आता मुख्यमंत्र्यांच्या कामाची यादी जाहीर झाली आहे. त्यामध्ये योगी आदित्यनाथ हे पहिल्या क्रमांकावर आहेत. तर आपले मुख्यमंत्री दहाव्या क्रमांकावर आहेत. (सर्व फोटो सौजन्य-आकाश पाटील, इंडियन एक्स्प्रेस)

  • 3/10


    पहलगाममध्ये धर्म विचारून भारतीयांना ठार करण्यात आलं. पण त्याच पाकिस्तानसोबत हे क्रिकेट खेळतात. यांनी क्रिकेटची तुलना युद्धाशी केली हा त्यांचा निर्लज्जपणा. एकीकडे बाप देशप्रेमाचं नाटक करतोय आणि दुसरीकडे पोरगा पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळतोय, ही यांची घराणेशाही. असं उद्धव ठाकरे म्हणाले.

  • 4/10

    भाजपाने आपले कमळ फुलवण्यासाठी सगळीकडे चिखल करून ठेवला, त्यांनी कायद्यांचा दुरुपयोग करून अनेकांना तुरुंगात टाकले. देशभक्त असणारे सोनम वांगचूक एका परिषदेच्या निमित्ताने पाकिस्तानला गेले म्हणून त्यांना देशद्रोही ठरवण्यात आले. मग गुपचूपपणे पाकिस्तानला जाऊन नवाज शरिफांच्या वाढदिवसाचा केक खाणारे मोदी कोण?

  • 5/10

    तीन वर्षांपासून मणिपूर जळत आहे. पण आता पंतप्रधान मोदी त्या ठिकाणी गेले. मणिपूरमध्ये जाऊन दंगलग्रस्त भागातील नागरिकांना धीर देतील असं वाटत होतं. पण हे त्या लोकांना भेटलेच नाहीत. मणिपूरच्या नावात मणी असल्याचा उल्लेख त्यांनी केला, पण तिथल्या लोकांच्या डोळ्यातील अश्रू यांना दिसत नाहीत.

  • 6/10

    राज्याचे सध्याचे मुख्यमंत्री, जेव्हा विरोधी पक्षात होते तेव्हा ओला दुष्काळ जाहीर करा म्हणाले होते. आज म्हणतात की ओला दुष्काळ असा काही प्रकारच नाही. कोणतेही निकष न लावता सरकारने हेक्टरी ५० हजार रुपये जाहीर करावे. आपलं सरकार असताना कर्ज माफी केली होती.

  • 7/10


    एका बाजूला हे मुस्लिमांना शिव्या देणार, त्यांना देशद्रोही म्हणणार, आणि त्याचवेळी आरएसएसचे मोहन भागवत हे दिल्लीमध्ये मुस्लिम मौलवींची भेट घेणार ही अशी यांची नीती आहे.हिंदुत्वावरून आमच्या अंगावर येऊ नका, नाहीतर तुमच्या सगळ्या टोप्या घातलेले फोटो आम्ही समोर आणू.

  • 8/10

    सोनम वांगचूक हे देशभक्त, त्यांनी लेह लडाखसारख्या दुर्गम भागात अनेक कामं केली. थंडीत काम करणाऱ्या जवानांसाठी त्यांनी सोलार छावण्या बांधून दिल्या. पाण्याची कमतरता होती त्या ठिकाणी आईस स्तूपच्या माध्यमातून पाणी उपलब्ध करून दिले. सोनम वांगचूक यांनी लडाखच्या न्याय हक्कासाठी लढा सुरू केला. पण मोदींनी त्यांच्यावर रासुका लावला. त्यामुळे अशा कायद्यांचा दुरुपयोग केला जातो. मोदींची स्तुती करेपर्यंत ते देशभक्त होते, आता देशद्रोही कसे झाले.

  • 9/10




    उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आला आहे. जिथे मराठीची गळचेपी होणार, मातृभाषेचा विषय येईल त्या ठिकाणी आम्ही सगळं विसरून एकत्र येणार. भाषावार प्रांत रचना झाल्यानंतर मुंबई महाराष्ट्राला मिळाली नव्हती, ती आम्ही मिळवली. आता ही मुंबई कुठल्या व्यापाऱ्याच्या घशात जाणार असेल तर कुणालाही सोडणार नाही.

  • 10/10

    तुमच्याकडे मतं विकत घ्यायला पैसे आहेत पण शेतकऱ्यांचे अश्रू पुसायला पैसे नाहीत हा माझा तुमच्यावर आरोप आहे असंही उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले.

TOPICS
उद्धव ठाकरेUddhav Thackeray

Web Title: Uddhav thackeray dasara melava speech imp points in his speech what did he say about bjp and eknath shinde scj

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.