-
शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात एक गंभीर आरोप उद्धव ठाकरेंवर केला. त्यानंतर एकच खळबळ उडाली. (सर्व फोटो सौजन्य-फेसबुक पेज रामदास कदम)
-
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरेंसह अनेक वर्षे काम केलं. निष्ठावान आणि आक्रमक शिवसैनिक ही त्यांची ओळख
-
रामदास कदम यांनी आजवर अनेकदा शिवसेनेसाठी आंदोलनंही केली आहेत.
-
२०२२ ला रामदास कदम हे एकनाथ शिंदेंच्या बरोबर शिवसेनेत गेले. उद्धव ठाकरेंनी त्यांना डावललं असा आरोप त्यांनी त्याआधीही केला होता. मात्र दसरा मेळाव्यात त्यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप केला.
-
एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी हा आरोप केला की उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले.
-
उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप झाल्यानंतर त्यांना याबाबत विचारणा करण्यात आली तेव्हा त्यांनी मी गद्दारांच्या आरोपांना उत्तर देत नाही म्हणत थेट प्रतिक्रिया दिली.
-
यानंतर मैदानात उतरले ते उद्धव सेनेचे शिलेदार अनिल परब. त्यांनी तर रामदास कदम यांनी नीचपणा केल्याचं म्हणत आरोप खोडले.
-
दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूच्या वेळी रामदास कदम तिथे नव्हतेच असंही वक्तव्य केलं. ज्यावर रामदास कदम यांनीही उत्तरं दिली.
-
शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही रामदास कदम यांना मानसिक उपचारांची गरज आहे
-
अनिल परब यांनी रामदास कदम यांच्या पत्नीबाबत आरोप केले. त्या आरोपांनाही रामदास कदम यांनी उत्तरं दिली. दोन्ही नेत्यांमध्ये यावरुन कलगीतुरा रंगलेला पाहण्यास मिळाला. मागील चार दिवसांत शिवसेनेतलं वातावरण या आरोपांच्या फैरींमुळे ढवळून निघाल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या मृत्यूबाबत उद्धव ठाकरेंवर रामदास कदमांचे गंभीर आरोप, शिवसेनेचं राजकारण कसं ढवळलं गेलं?
दसरा मेळाव्यात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरेंवर आरोप करुन खळबळ उडवून दिली. मागच्या चार दिवसांत काय घडलं?
Web Title: Ramdas kadam serious allegations on uddhav thackeray about balasaheb thackeray death and other things what happened in last four days scj