• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • सरन्यायाधीश भूषण गवई
  • PM नरेंद्र मोदी
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. news
  4. maharashtra govt announces rs 31628 crore relief package for flood hit area and farmers asc

प्रति कोंबडी १०० रुपये, दुधाळ जनावरासाठी ३७ हजार; मुख्यमंत्री फडणवीसांच्या १० मोठ्या घोषणा

राज्यात यंदा १ कोटी ४३ लाख ५२ हजार २८१ हेक्टर जमिनीवर लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८ लाख ६९ हजार ७५६ हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे.

October 7, 2025 16:17 IST
Follow Us
  • Devendra Fadnavis On Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह जमिनीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. (PC : Devendra Fadnavis FB)
    1/11

    Devendra Fadnavis On Flood Relief Package : महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक भागांत शेती, घरांसह जमिनीचं नुकसान झालं आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांना व पूरग्रस्तांना मदत करावी अशी मागणी केली जात होती. त्यानंतर आता राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदतीच्या पॅकेजची घोषणा केली आहे. शेतकऱ्यांसाठी तब्बल ३१ हजार ६२८ कोटी रुपयांचं पॅकेज जाहीर करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा केली आहे. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 2/11

    राज्यात यंदा १,४३,५२,२८१ हेक्टर जमिनीवर लागवड करण्यात आली होती. त्यापैकी ६८,६९,७५६ हेक्टर जमिनीवरच्या पिकांचं नुकसान झालं आहे. काही जमिनींवर अंशत: पण मोठ्या प्रमाणावर पूर्णत: नुकसान झालं आहे. २९ जिल्ह्यांमध्ये मोठं नुकसान झालं असून तिथल्या २५३ तालुक्यांमध्ये सरसकट मदत दिली जाणार. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 3/11

    ६५ मिलिमीटरची अट ठेवलेली नाही. म्हणजेच एखाद्या भागात ६५ मिलीमीटर पाऊस पडलेला नसेल परंतु, पुरामुळे नुकसान झालं असेल तरी तिथल्या लोकांना मदत केली जाईल. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 4/11

    १०० टक्के घरं गेलेल्या ठिकाणी पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पूर्णपणे नवीन घर समजून पैसे दिले जातील. अंशत: पडझड झालेल्या घरांनाही मदत केली जाईल. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 5/11

    ज्यांच्या दुकानांचं व गोठ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना ५० हजार रुपयांपर्यंतची मदत केली जाईल. दुधाळ जनावरांसाठी ३७,५०० रुपयांपर्यंत प्रती जनावर अशी मदत केली जाईल. ओढकाम करणाऱ्या जनावरांसाठी ३२ हजार रुपये प्रतिजनावर दिले जातील. एनडीआरएफच्या नियमांमधील तीन जनावरांची मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. कोंबड्यांसाठी १०० रुपये प्रतिकोंबडी मदत दिली जाईल.(PC : Devendra Fadnavis FB)

  • 6/11

    खरडून गेलेल्या जमिनींसाठी ४७ हजार रुपये हेक्टरी रोख आणि ३ लाख रुपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून दिले जातील.(PC : Devendra Fadnavis FB)

  • 7/11

    बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून ३० हजार रुपये प्रतिविहीर दिले जातील. पायाभूत सुविधांच्या नुकसानीची भरपाई म्हणून १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 8/11

    दुष्काळावेळच्या सर्व उपाययोजना ओला दुष्काळ समजून केल्या जातील. तसेच जमीन महसुलात सूट, कर्जाचं पुनर्गठन, शेतीशी निगडित कर्जाची वसुली, शालेय-महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कात माफी अशा सर्व गोष्टी लागू केल्या आहेत.(PC : Devendra Fadnavis FB)

  • 9/11

    पीकनुकसान भरपाईसाठी ६५ लाख हेक्टर जमिनीसाठी ६,१७५ कोटी रुपये देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रबीच्या पिकांसाठी प्रतिहेक्टरी अतिरिक्त १० हजार रुपये दिले जातील. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 10/11

    कोरडवाहू जमिनीसाठी हेक्टरी १८ हजार ५००, हंगामी बागायतीला २७ हजार तर बागायती शेतकऱ्याला ३२,५०० रुपये हेक्टरी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (PC : Devendra Fadnavis FB)

  • 11/11

    ४५ लाख शेतकऱ्यांचा विमा उतरवला आहे. त्यामुळे पूर्ण नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना वरील मदतीव्यतिरिक्त साधारण १७ हजार हेक्टरी विम्याचे पैसे मिळतील. राज्य सरकारच्या वतीने नुकसान भरपाईसाठी एकूण ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज दिलं जात आहे.(PC : Devendra Fadnavis FB)

TOPICS
दुष्काळ (Drought)Droughtदेवेंद्र फडणवीसDevendra FadnavisपूरFloodमराठवाडाMarathwada

Web Title: Maharashtra govt announces rs 31628 crore relief package for flood hit area and farmers asc

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.