-
बिहार कॅडरचे माजी आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे यांनी दोन जागांवरून बिहार विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे.
-
२०२४ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या शिपदीप लांडे यांनी काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर केला होता.
-
या व्हिडिओमध्ये त्यांनी म्हटले होते की, “मी बिहारमधील आगामी निवडणूक जमालपूर आणि अररिया या दोन विधानसभा जागांवरून अपक्ष उमेदवार म्हणून लढवण्याचा निर्णय घेतला आहे.”
-
“या वर्षी एप्रिलमध्ये मी स्थापन केलेला हिंद सेना हा राजकीय पक्ष आतापर्यंत निवडणूक आयोगाने नोंदणीकृत केलेला नाही त्यामुळे अपक्ष निवडणूक लढवत आहे”, असेही त्यांनी नमूद केले होते.
-
शिवदीप लांडे हे मुंगेर, अररिया आणि पाटणा शहरसह अनेक जिल्ह्यांचे जिल्हा पोलीस प्रमुख होते. ते पाच वर्षांसाठी प्रतिनियुक्तीवर महाराष्ट्रातही गेले होते. २०२२ मध्ये ते बिहारला परतले आणि कोसी रेंजचे उपमहानिरीक्षक म्हणून रुजू झाले होते.
-
शिवसेनेचे (एकनाथ शिंदे) पुरंदरचे आमदार विजय शिवतारे यांचे जावई असलेले शिवदीप लांडे यांचे मूळ गाव अकोल जिल्ह्यात आहे.
-
२००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते बिहारचे दंबग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.
-
१९ सप्टेंबर २०२४ मध्ये त्यांनी अचानक पोलीस सेवेतून निवृत्ती घेतली होती. राजीनामा देऊन आपण बिहारमध्येच राहणार असून या राज्याची सेवा करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले होते. राजीनामा दिल्यानंतर शिवदीप लांडे यांनी एप्रिल २०२५ मध्ये हिंद सेना पक्षाची स्थापना केली होती. (Photo: Shivdeep Lande/Social Media)
शिंदे गटाच्या आमदाराचे जावई शिवदीप लांडे बिहार निवडणुकीच्या मैदानात; बाजी मारणार का?
Former IPS officer Shivdeep Lande: २००६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या शिवदीप लांडे यांची पोस्टिंग बिहारमध्ये झाली होती. तेव्हापासून ते बिहारचे दंबग पोलीस अधिकारी म्हणून प्रसिद्ध होते.
Web Title: Former ips officer shivdeep lande bihar assembly elections 2025 contesting as independent candidate jamalpur araria political party hind sena founder aam