• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • अजित पवार
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. cm eknath shinde celebrated diwali with farmers at varsha residence mumbai abdul sattar pravin darekar were present rvs

PHOTO: बळीराजासोबत मुख्यमंत्र्यांनी साजरी केली दिवाळी; ‘धीर सोडू नका’, शिंदेंचं शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी खचून न जाता आलेल्या संकटाचा सामना करावा, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे

October 28, 2022 20:05 IST
Follow Us
  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान 'वर्षा'वर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.
    1/12

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शासकीय निवासस्थान ‘वर्षा’वर शेतकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली.

  • 2/12

    शेतकरी बंधू-भगिनींना शुभेच्छा देत मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासोबत फराळाचा आस्वाद घेतला.

  • 3/12

    तुम्ही धीर सोडू नका, राज्य सरकार तुमच्या पाठिशी आहे, अशी ग्वाही यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.

  • 4/12

    एनडीआरएफचे नियम बाजूला ठेवून शेतकऱ्यांना राज्य सरकारने दुप्पट मदत केली, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

  • 5/12

    शेतकऱ्यांनी खचून न जाता आलेल्या संकटाचा सामना करावा, असे आवाहन शिंदे यांनी यावेळी केले.

  • 6/12

    “माझ्याकडे पण शेती आहे. माझे वडील, आजोबा सर्व शेतकरी आहेत. शेतकरी कुटुंबातला साधा माणुस मुख्यमंत्री होतो, हेदेखील या राज्याने आणि देशानं पाहिलं आहे”, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

  • 7/12

    अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानामुळे राज्य सरकारवर विरोधी पक्षांकडून सडकून टीका केली जात आहे. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

  • 8/12

    “नियम बाजूला ठेवून काम करणारं हे सरकार आहे. बळीराजाला संकटात ठेवून हे सरकार पुढं जाऊ शकत नाही. शेतकऱ्यांना न्याय देत सरकार पुढे जाणार आहे” असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

  • 9/12

    मुंबईतील या कार्यक्रमात राज्यभरातील शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती.

  • 10/12

    ‘वर्षा’वरील या कार्यक्रमात संपूर्ण शिंदे कुटुंबियांनी सहभाग घेतला होता.

  • 11/12

    सगळ्यात महत्त्वाचा घटक बळीराजा आहे. नैसर्गिक आपत्तीत सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

  • 12/12

    या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना भेटवस्तू देत त्यांचा सन्मान केला. (‘सर्व फोटो- एकनाथ शिंदे इन्स्टाग्राम’)

TOPICS
एकनाथ शिंदेEknath Shindeदिवाळी २०२५Diwali 2025महाराष्ट्रातील शेतकरीMaharashtra Farmers

Web Title: Cm eknath shinde celebrated diwali with farmers at varsha residence mumbai abdul sattar pravin darekar were present rvs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.