-
कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक यांनी रिझव्र्ह बँकेनं दिलेल्या मुदतीच्या तीन महिने आधीच या खासगी क्षेत्रातील बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे. ३८ वर्षापूर्वी म्हणजे १९९८५ साली उदय कोटक यांनी आपल्या कारकीर्दीला सुरुवात केली होती.
-
केवळ १३ कर्मचाऱ्यांसह ३०० चौरस फुटांच्या कार्यालयात उदय कोटक यांनी भारतातील तिसऱ्या क्रमाकांच्या खाजगी बँकेची पायाभरणी केली होती. मुंबईत जन्मलेल्या उदय कोटक यांचा कौटुंबीक कापड व्यवसाय होता. त्यामुळे आपल्या पारंपारिक व्यवसायात उदय कोटक यांनी नशिब आजमावलं. पण, तिथे त्याचं मन रमलं नाही.
-
एमबीए करत असताना स्वत:चा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय कोटक यांनी घेतला. अखेर २६ व्या वर्षी कोटक यांनी स्मॉल फायनान्स बँक सुरू केली. ६० लाख रूपयांच्या गुंतवणूकीसह १९८५ साली कोटक कॅपिटल मॅनेजमेंट फायनान्स लिमिटेडची सुरूवात झाली.
-
महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा हे उदय कोटक यांचे चांगले मित्र होते. त्यांनी कोटक कॅपिटल मॅनेजमेंटमध्ये गुंतवणूक केली. यानंतर कंपनीचे नाव बदलून कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड करण्यात आलं.
-
२००३ साली रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेडला खाजगी बँकिंग करण्यासाठी परवानगी दिली. महिंद्रा फायनान्स लिमिटेड खाजगी क्षेत्रात परवानगी मिळवणारी पहिली बँक होती. त्यानंतर अवघ्या ११ वर्षात यशाच्या पायऱ्या चढत कोटक महिंद्रा बँक देशातील दुसरी व्यावसायिक बँक ठरली. आजमितीस कोटक महिंद्र बँकेचे बाजार भांडवल ३.५० कोटी रुपयांचं आहे.
-
उदय कोटक २०१९ मध्ये भारतातील सर्वाधिक पगार घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले. उदय कोटक यांना महिन्याला २७ लाख रूपये पगार होता. कोटक यांची एकूण संपत्ती १ लाख १० हजार २० कोटी रूपये आहे. ‘न्यूज १८ हिंदी’ने हे वृत्त दिलं आहे. ( फोटो सौजन्य – इंडियन एक्स्प्रेस, फायनान्सियल एक्स्प्रेस )
१३ कर्मचारी, १ रूम अन् ६० लाखांची गुंतवणूक, २६ व्या वर्षी कोटक यांनी हिंमत दाखवली; उभारलं ‘इतक्या’ लाख कोटींचं साम्राज्य
उदय कोटक २०१९ मध्ये भारतातील सर्वाधिक पगार घेणारे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले होते.
Web Title: Uday kotak who started kotak mahindra bank with one room 60 lakh capital ssa