• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. tesla mumbai showroom nameplate in marathi or english see photo aam

मुंबईतील टेस्ला शोरूमच्या नावाची पाटी मराठीत की इंग्रजीत? पाहा फोटो…

Tesla Mumbai Marathi Name Plate: टेस्लाने अखेर मुंबईत त्यांच्या पहिल्या शोरूमची सुरुवात करत भारतात प्रवेश केला आहे. त्यांचे हे शोरूम वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स (बीकेसी) मध्ये असून ते ४,००० चौरस फूटांचे आहे.

July 15, 2025 13:25 IST
Follow Us
  • Tesla Mumbai Showroom Name Plate In Marathi
    1/1

    गेल्या काही दिवसांपासून राज्यात मराठी भाषेचा मुद्दा गाजत आहे. अशात आज अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या टेस्ला कंपनीचे शोरूम मुंबईत सुरू झाले आहे. (Photo: Social Media)

  • 2/1

    दरम्यान टेस्लाचे शोरूम मुंबईत सुरू झाल्यानंतर त्याच्या नावाची पाटी मराठी आहे की इंग्रजीत याबाबत अनेकांना उत्सुकता निर्माण झाली आहे. (Photo: Social Media)

  • 3/1

    अशात मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्पेक्समध्ये असलेल्या टेस्ला शोरूमचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo: Soial Media)

  • 4/1

    या व्हायरल फोटोंमध्ये टेस्लाच्या शोरूमच्या नावाची पाटी मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये असल्याचे दिसत आहे. (Photo: Social Media)

  • 5/1

    शोरूमच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या बाजूला मराठीमध्ये तर उजव्या बाजूला इंग्रजीमध्ये ‘टेस्ला’ असे लिहिलेले दिसत आहे. (Photo: Social Media)

  • 6/1

    टेस्लाने आज शोरूमसह मॉडेल वाय कारही लाँच केल्या आहेत. या दोन प्रकारांमध्ये उपलब्ध असतील. पहिला प्रकार रियर-व्हील ड्राइव्ह मॉडेल आहे, ज्याची किंमत ६०.१ लाख रुपये आहे आणि दुसरा प्रकार लांब पल्ल्याचा आहे, ज्याची किंमत ६७.८ लाख रुपये आहे. (Photo: ANI)

  • 7/1

    भारतात टेस्ला कारची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारपेठेपेक्षा खूपच जास्त आहे, ज्याचे थेट कारण भारतात आकारले जाणारे मोठे आयात शुल्क आहे. (Photo: Social Media)

  • 8/1

    अमेरिकेत टेस्ला मॉडेल वायची किंमत ३८.६ लाख रुपये आहे, तर चीनमध्ये त्याच मॉडेलची किंमत ३०.५ लाख रुपये आहे, तर जर्मनीमध्ये ही कार ४६ लाख रुपयांना खरेदी करता येते. (Photo: PTI)

  • 9/1

    भारतात टेस्ला इलेक्ट्रिक कारचे उत्पादन सुरू होईपर्यंत या कार सीबीयू म्हणून विकल्या जातील. पण, एलॉन मस्क यांच्या टेस्लाने आतापर्यंत टेस्ला कारच्या स्थानिक उत्पादनावर मौन बाळगले आहे. (Photo: Social Media)

  • 10/1

    याचबरोबर शोरूमच्या प्रवेशद्वारावर आधी मराठी आणि नंतर इंग्रजी भाषेत ‘टेस्ला इंडिया मोटर्स आणि एनर्जी लिमिटेड असे’ लिहिले असल्याचे दिसत आहे. (Photo: ANI)

TOPICS
एलॉन मस्कElon MuskकारCarटेस्लाTeslaमराठीMarathiमुंबईMumbai

Web Title: Tesla mumbai showroom nameplate in marathi or english see photo aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.