-
ग्राहकांना त्यांच्या मौल्यवान वस्तू सुरक्षितपणे ठेवण्यास मदत व्हावी यासाठी बँका सेफ डिपॉझिट लॉकर्स सुविधा पुरवतात.
-
या लॉकर्सचे वार्षिक शुल्क त्यांच्या आकारानुसार आणि शाखेच्या ठिकाणानुसार बदलते आणि ते आर्थिक वर्षासाठी आधिच भरावे लागते.
-
याव्यतिरिक्त, बँकांना लॉकर-भाड्याने घेणाऱ्यांना लॉकर कराराची स्वाक्षरी केलेली प्रत प्रदान करणे आवश्यक असते, ज्यामध्ये त्यांचे अधिकार आणि जबाबदाऱ्या स्पष्टपणे स्पष्ट केलेल्या असतात.
-
वार्षिक लॉकर शुल्काव्यतिरिक्त, बँका विविध प्रकारचे अतिरिक्त शुल्क आकारतात जे ग्राहकांनी सुरक्षित ठेव लॉकर सुविधा घेण्यापूर्वी विचारात घ्यावेत.
-
हे शुल्क एका बँकेनुसार बदलू शकतात, परंतु त्यामध्ये सामान्यणे खालील गोष्टींचा समावेश असतो.
-
लॉकर वाटपाच्या वेळी देय शुल्क, ज्यामध्ये प्रशासकीय आणि कागदपत्रांचा खर्च यांचा समोवेश असतो.
-
ग्राहकांना लॉकरला वर्षातून काही विशिष्ट वेळा मोफत भेटी देण्याची परवानगी असते. या मर्यादेपेक्षा जास्त भेटी दिल्यास अतिरिक्त शुल्क आकारले जाते.
-
जर वार्षिक लॉकर शुल्क देय तारखेपर्यंत भरले नाही, तर बँक थकीत दंड आकारू शकते.
-
काही प्रकरणांमध्ये लॉकर जबरदस्तीने उघडावे लागते, जसे की भाडे न भरणे, चाव्या हरवणे किंवा ग्राहकाच्या विनंतीनुसार लॉक तोडणे, बदलणे आणि संबंधित प्रक्रियांसाठी शुल्क लागते.
-
एचडीएफसी बँकेच्या वेबसाइटनुसार, “चावी बदलण्याचे शुल्क लॉकर धारकांकडून वसूल केले जाते. लॉकर धारक आणि बँक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत अधिकृत विक्रेत्याकडून चावी बदलली जाते.” (All Photos: Canva)
बँक लॉकर सुविधा वापरताय? हे छुपे शुल्क माहित असल्याशिवाय बँक करारावर स्वाक्षरी करू नका
Bank Lockers: या लॉकर्सचे वार्षिक शुल्क त्यांच्या आकारानुसार आणि शाखेच्या ठिकाणानुसार बदलते आणि ते आर्थिक वर्षासाठी आधिच भरावे लागते.
Web Title: Bank locker facility know these hidden charges before signing the agreement aam