• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • Ind Vs Pak Live Score
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. tourist places how did these places in the world become famous tourist destinations what is the history find out gkt

Tourist Places : जगातील ‘ही’ स्थळे प्रसिद्ध पर्यटन ठिकाणे कशी बनली? काय आहे इतिहास? जाणून घ्या!

जगभरातील काही प्रसिद्ध ठिकाणे पर्यटन स्थळांमध्ये कशी रूपांतरित झाली. ही ठिकाणे तुमच्या बकेट लिस्टमध्ये नक्कीच असायला हवीत. जाणून घ्या!

September 28, 2025 17:50 IST
Follow Us
  • travel
    1/7

    भारतातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे पाहण्यासाठी देश-विदेशातून लोक भारतात येत असतात. यात काही सुंदर ठिकाणे देखील आहे. दरम्यान जगात अशी काही ठिकाणे आहेत, जे लोकप्रिय पर्यटन स्थळांमध्ये रूपांतरित झाले आहेत. त्याबाबत जाणून घेऊयात. (Photo Source by Wikimedia Commons)

  • 2/7

    बीटल्स आश्रम, ऋषिकेश : हे महर्षी महेश योगींच्या आश्रमाचं दुसरं नाव आहे जिथे १९६८ मध्ये बीटल्स बँड राहत होते, हे आध्यात्मिक आश्रम आता जनतेसाठी खुले आहे. सध्या हा आश्रम ‘बीटल्स आश्रम’ म्हणून ओळखला जातो आणि पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण बनला आहे.(Photo Source by Wikimedia Commons)

  • 3/7

    बोडी घोस्ट टाउन : बोडी आता कॅलिफोर्नियातील ऐतिहासिक पर्यटन स्थळ बनलं आहे. जिथे तुम्हाला दशकांपूर्वीच सलून, घरे आणि शाळा दिसू शकतात. संस्कृतीचे प्रतीक असलेलं एक ऐतिहासिक गाव आहे.(Photo Source by Wikimedia Commons)

  • 4/7

    हाशिमा बेट (आयलंड): एकेकाळी कोळसा खाणकाम केंद्र असलेले हे बेट १९७० च्या दशकात सोडून देण्यात आलं होतं. मात्र, आता हे बेट रिकामे असून तेथील इमारती आणि आजूबाजूच्या समुद्राला वेढणारी भिंत (सीवॉल) हे येथील प्रमुख वैशिष्ट्य आहे.(Photo Source by Wikimedia Commons)

  • 5/7

    कोल्मनस्कोप : हे नामिबियाच्या वाळवंटाच्या मध्यभागी असलेलं एक ओसाड शहर आहे. एकेकाळी हे शहर हिऱ्यांनी भरलेलं होतं, मात्र, आता ते गुडघाभर वाळूत गाडलेल्या जीर्ण घरांनी भरलं आहे. निसर्गाने मानवी जागा पुन्हा मिळवल्याचं येथे दिसून येतं.(Photo Source by Wikimedia Commons)

  • 6/7

    प्रिपियट : हे युक्रेनमध्ये आहे. चेरनोबिल दुर्घटनेनंतर हे शहर सोडून देण्यात आलं होतं. हे एक त्यागलेलं शहर म्हणून ओळखलं जातं. या शहरात आजही किरणोत्सर्गाचा धोका असल्याने तेथे लोक वस्ती नाही आणि ते एक पर्यटन स्थळ बनले आहे.(Photo Source by Wikimedia Commons)

  • 7/7

    वरोशा : हे सायप्रसमधील एक प्रसिद्ध शहर आहे. एकेकाळी हे सायप्रसचं प्रमुख पर्यटन केंद्र होतं. मात्र, १९७४ च्या तुर्की आक्रमणानंतर हे शहर सोडून देण्यात आलं, तेव्हापासून ते एक निर्जन शहर बनलं आहे.(Photo Source by Wikimedia Commons)

TOPICS
आंतरराष्ट्रीय बातम्याInternational Newsपर्यटनTourismपर्यावरणEnvironment

Web Title: Tourist places how did these places in the world become famous tourist destinations what is the history find out gkt

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.