-
अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोतील टेलर ए. हम्फ्री नावाच्या महिलेची सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. कारण त्यांनी बाळांची नावे सुचवण्याच्या त्यांच्या आवडीचे रूपांतर एका लक्झरी व्यवसायात केले आहे.
-
टेलर ए. हम्फ्री पालकांना त्यांच्या बाळांची नावे ठेवण्यास मदत करण्यासाठी अंदाजे २६ लाख रुपयांपर्यंत शुल्क आकारतात. याबाबत द न्यू यॉर्क पोस्टने वृत्त दिले आहे.
-
टेलर ए. हम्फ्री सुमारे दहा वर्षांपूर्वी आपल्या आवडीचे रूपांतर व्यवसायात केले होते. त्यांचे टिकटॉक आणि इन्स्टाग्रामवर १ लाखाहून अधिक फॉलोअर्स आहेत. त्यांनी ५०० हून अधिक मुलांची नावे ठरवण्यास मदत केली आहे.
-
ब्रँडिंग, मार्केटिंग आणि डौला प्रशिक्षणाची पार्श्वभूमी असलेल्या टेलर ए. हम्फ्री स्वतःचे “नेम नर्ड” म्हणून वर्णन करतात. त्या नावे सुचवण्यासाठी पालकांच्या आवडी समजून घेण्यासाठी तपशीलवार प्रश्नावलीचा वापर करतात.
-
द न्यू यॉर्क पोस्टनुसार, त्या वैयक्तिकृत नाव सुचवण्याच्या ईमेल सूचीसाठी २०० डॉलर्सपासून सुरू होणारी सेवा देतात आणि वंशावळी संशोधन व बाळाच्या नावाचे ब्रँडिंग यासारख्या विशेष पॅकेजेससाठी तब्बल २६ लाख रुपये आकारतात.
-
टेलर ए. हम्फ्री म्हणतात की, या कामात फक्त नावे निवडणे इतकेच नाही. बहुतेकदा पालकांशी चर्चेदरम्यान थेरपिस्ट किंवा मध्यस्थ म्हणूनही काम करावे लागते.
-
टेलर ए. हम्फ्री यांच्याकडे असे अनेक ग्राहक आहेत, ज्यात श्रीमंतांपासून ते हाय-प्रोफाइल सेलिब्रिटींपर्यंतच्या लोकांचा समावेश आहे, जे त्यांच्या बाळासाठी परिपूर्ण नाव शोधण्यासाठी त्यांची मदत घेतात.
-
२०२१ च्या न्यू यॉर्कर प्रोफाइलपासून टेलर ए. हम्फ्री यांची मागणी वाढली आहे, ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीकाही झाली. यामुळे त्यांना त्यांचे शुल्क आणि लक्झरी व्यवसाय वाढविण्यास मदतच झाल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
-
“मला या वस्तुस्थितीशी जुळवून घ्यावे लागले की, लोक मला अनेकदा माझ्यावर थट्टा करणाऱ्या कंटेंटमधून शोधतात”, असे टेलर ए. हम्फ्री यांनी द पोस्टला सांगितले. “मी हे स्वीकारले आहे कारण मला वाटते की मी जे काम करत आहे ते खरोखर महत्त्वाचे आहे.”
-
“इंटरनेटवर तुमची खिल्ली उडवली जाते, तेव्हा ते थोडे वाईट वाटते. पण त्याच वेळी, मी म्हणते, ‘बरे, हे मूर्खपणाचे असले तरी मी जगण्यासाठी बाळांची नावे सुचवते.’” (All Photos:Taylor A. Humphrey/X And Instagram)
नावात काय आहे? अहो, नावातच सर्व काही आहे! मुलांची नावे सुचवण्यासाठी महिला घेते तब्बल २६ लाख रुपये
Taylor A. Humphrey Name Consultation Charges: टेलर ए. हम्फ्री म्हणतात की, या कामात फक्त नावे निवडणे इतकेच नाही. बहुतेकदा पालकांशी चर्चेदरम्यान थेरपिस्ट किंवा मध्यस्थ म्हणूनही काम करावे लागते.
Web Title: Taylor a humphrey baby names consultant naming expert usa expensive name selection help premium naming services aam