• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • दिवाळी २०२५
  • देवेंद्र फडणवीस
  • QUIZ-बिहार निवडणूक
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. picture gallery others
  4. nobel laureate maria corina machado want to meed pm narendra modi praises india as model democracy aam

शांतता नोबेल पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना का भेटायचे आहे? म्हणाल्या…

Maria Corina Machado: माचाडो यांनी पुढे नमूद केले की, व्हेनेझुएलाचे समाजवादी सरकार गेल्यानंतर, भारतीय कंपन्या व्हेनेझुएलाच्या ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि दूरसंचार क्षेत्रात मोठी भूमिका बजावू शकतात.

October 25, 2025 16:50 IST
Follow Us
  • Nobel Peace prize winner 2025 Maria Corina Machado
    1/9

    व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या आणि २०२५ च्या नोबेल शांतता पुरस्कार विजेत्या मारिया कोरिना मचाडो यांनी भारताच्या लोकशाहीचे कौतुक केले आहे. त्यांनी भारताची लोकशाही इतर देशांसाठी एक उदाहरण असल्याचे म्हटले आहे.

  • 2/9

    मारिया कोरिना मचाडो म्हणाल्या की, जेव्हा देश लोकशाहीकडे वळेत तेव्हा भारत व्हेनेझुएलासाठी “महत्वाचा भागीदार” म्हणून उदयास येऊ शकतो.

  • 3/9

    व्हेनेझुएलामध्ये लोकशाही आणण्यासाठी गेली अनेक वर्षे संघर्ष केल्याबद्दल नोबेल शांतता पुरस्काराने सन्मानित झालेल्या मचाडो यांनी भारताच्या लोकशाही परंपरा आणि आंतरराष्ट्रीय प्रभावाचे कौतुक केले.

  • 4/9

    “भारत अनेक देशांसाठी जगातील सर्वात मोठी लोकशाही म्हणून एक उदाहरण आहे”, असे त्यांनी टाईम्स नाऊशी संवाद साधताना सांगितले.

  • 5/9

    १९६७ मध्ये जन्मलेल्या मचाडो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्याची आणि “लवकरच त्यांना स्वतंत्र व्हेनेझुएलामध्ये पाहुणे म्हणून बोलवण्याची” आशा व्यक्त केली.

  • 6/9

    मचाडो यांनी नमूद केले की, त्यांच्या मुलीने अलीकडेच भारताला भेट दिली आहे. तिचे अनेक व्हेनेझुएलन मित्र भारतात राहतात.

  • 7/9

    नोबेल पुरस्कार विजेत्या मचाडो यांनी असेही म्हटले आहे की, त्यांचे भारतीय राजकारणावर बारकाईने लक्ष असते. त्यांनी सांगितले की, त्या महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्वाज्ञानापासून प्रेरित आहेत.

  • 8/9

    माचाडो यांनी पुढे नमूद केले की, व्हेनेझुएलाचे समाजवादी सरकार गेल्यानंतर, भारतीय कंपन्या व्हेनेझुएलाच्या ऊर्जा, पायाभूत सुविधा आणि दूरसंचार क्षेत्रात मोठी भूमिका बजावू शकतात.

  • 9/9

    आंतरराष्ट्रीय पाठिंब्याची कबुली देत, माचाडो यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे व्हेनेझुएलाच्या लोकशाही संघर्षात “प्रमुख भागिदार” म्हणून वर्णन केले. (All Photo: @MariaCorinaYA)

TOPICS
नरेंद्र मोदीNarendra Modiनोबेल पुरस्कारNobel Prizeनोबेल शांतता पुरस्कारNobel Peace Prize

Web Title: Nobel laureate maria corina machado want to meed pm narendra modi praises india as model democracy aam

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.