• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. the flying sikh flying sikh milkha singh death flying sikh milkha singh news milkha singh rare photos bmh

फाळणीच्या जखमा ते एका सेकंदाने हुकलेलं पदक… असा आहे मिल्खा सिंग यांचा खडतर संघर्ष

महान धावपटू मिल्खा सिंग यांचा हा खडतर संघर्ष प्रेरणादायी तर आहेच प्रत्येकाच्या मनाला हळवा करणाराही… त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत…

June 19, 2021 09:02 IST
Follow Us
  • स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारताच्या फाळणीदरम्यान उसळलेल्या दंगलीची झळ मिल्खा सिंग यांनाही बसली. या भळभळत्या जखमा घेऊनच ते आयुष्यभर धावत राहिले. मुलतानजवळील लायलूर गावात आई-वडिलांची झालेली हत्या.. वडिलांचे कानावर पडलेले ‘भाग मिल्खा भाग’ हे शब्द.. रात्रभर पळत पळत स्वत:ची केलेली सुटका.. समोर मृत्यू दिसत असताना महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे गाठलेली दिल्ली.. खडतर परिस्थितीत घालवलेले दिवस.. सेनादलात सामील झाल्यानंतर घेतलेले परिश्रम.. राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये केलेली देदीप्यमान कारकीर्द.. पाकिस्तानात मिळवलेली ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी... ते रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाने एका सेकंदाने दिलेली हुलकावणी! महान धावपटू मिल्खा सिंग यांचा हा खडतर संघर्ष प्रेरणादायी तर आहेच प्रत्येकाच्या मनाला हळवा करणाराही... त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत...(Indian Express)
    1/10

    स्वातंत्र्यानंतर झालेल्या भारताच्या फाळणीदरम्यान उसळलेल्या दंगलीची झळ मिल्खा सिंग यांनाही बसली. या भळभळत्या जखमा घेऊनच ते आयुष्यभर धावत राहिले. मुलतानजवळील लायलूर गावात आई-वडिलांची झालेली हत्या.. वडिलांचे कानावर पडलेले ‘भाग मिल्खा भाग’ हे शब्द.. रात्रभर पळत पळत स्वत:ची केलेली सुटका.. समोर मृत्यू दिसत असताना महिलांच्या डब्यातून लाहोरमार्गे गाठलेली दिल्ली.. खडतर परिस्थितीत घालवलेले दिवस.. सेनादलात सामील झाल्यानंतर घेतलेले परिश्रम.. राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धामध्ये केलेली देदीप्यमान कारकीर्द.. पाकिस्तानात मिळवलेली ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी… ते रोम ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाने एका सेकंदाने दिलेली हुलकावणी! महान धावपटू मिल्खा सिंग यांचा हा खडतर संघर्ष प्रेरणादायी तर आहेच प्रत्येकाच्या मनाला हळवा करणाराही… त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाशझोत…(Indian Express)

  • 2/10

    भारताला नेहमीच अभिमान वाटणाऱ्या धावपटू मिल्खा सिंग त्यांचा जन्म १९२९ साली पंजाब प्रांतातील मुझ्झफरगढ या ठिकाणी झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर मुझफरगढ हे ठिकाण पाकिस्तानात सामिल करण्यात आला. फाळणीनंतर मिल्खा सिंग भारतात आले. फाळणीच्या संहारात १२ सदस्य असलेल्या त्यांच्या कुटुंबातील चौघेच जिवंत राहिले होते. (Indian Express Archive)

  • 3/10

    लष्करात भरती झाल्यानंतर मिल्खा सिंग यांच्यातील धावपटू भारताने आणि जगाने पाहिला. राष्ट्रीय, आशियाई, राष्ट्रकुल आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये त्यांनी देदीप्यमान कामगिरी केली… ‘फ्लाईंग सिख’ हा बहुमान मिळालेल्या मिल्खा सिंग यांनी १९६० (रोम) व १९६४ (टोकियो) साली झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं.

  • 4/10

    मिल्खा सिंग यांनी कुठल्याही सरावाशिवाय ऑलिम्पिकमध्ये ४०० मीटरचं अंतर केवळ ४५.९ सेकंदात पार केलं होतं. त्यांचा विक्रम अद्याप कोणत्याही भारतीयाला मोडता आलेला नाही. (Indian Express Archive)

  • 5/10

    पटियाला येथे १९५६ साली झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत ते पहिल्यांदा खऱ्या अर्थाने प्रकाशझोतात आले होते. २०० व ४०० मीटर शर्यंतीत त्यांनी विक्रमी वेळ नोंदवली होती. (Indian Express Archive)

  • 6/10

    १९५८ साली टोकियोत झालेल्या आशियाई स्पर्धत त्यांनी आपली कामगिरी कायम ठेवत २०० व ४०० मीटर शर्यतीत नवा आशियाई विक्रम नोंदवला. ६ सप्टेंबर १९६० साली रोम ऑलिम्पिकमध्ये त्यांनी ४०० मीटर शर्यतीत चौथा क्रमांक पटकावला होता. त्यावेळी ०.१ सेकंदानं त्यांचं कास्य पदक हुकलं होतं. त्या स्पर्धेत सराव न करता आणि बुटांशिवाय ते धावले होते. (Indian Express Archive)

  • 7/10

    १९५८ साली झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेतही २०० व ४०० मीटर धावण्याच्या शर्यतीत त्यांनी सुवर्ण पदक मिळवलं होतं. मनं जिंकून घेणारी मिल्खा सिंग यांची आणखी एक कृती म्हणजे जिंकलेली सर्व पदकं, चषक, ब्लेझर व आपले विक्रमी बूट त्यांनी राष्ट्रीय खेळ संग्रहालयाला दान केले आहेत. (Indian Express Archive)

  • 8/10

    ज्या देशात आपल्या कुटुंबाची हत्या करण्यात आली, त्याच पाकिस्तानात १९६०मध्ये भारत-पाकिस्तान मैत्रीच्या निमित्ताने अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेसाठी जाण्याची इच्छा नसतानाही पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शब्दाखातर मिल्खा सिंग यांना जावे लागलं. (olympics.com)

  • 9/10

    पाकिस्तानात पोहोचताच ‘मिल्खा-अब्दुल खालिद की टक्कर’ असे या स्पर्धेचे वर्णन होऊ लागले. पण वाऱ्याच्या वेगाने धावून भारताचा तिरंगा फडकावणाऱ्या मिल्खाला पाकिस्तानचे राष्ट्रपती आयूब खान यांनी ‘फ्लाईंग शिख’ ही उपाधी दिली. (Indian Express Archive)

  • 10/10

    रोम ऑलिम्पिकमध्ये सर्वाच्या नजरा मिल्खा सिंगवर असताना पहिल्या २०० मीटपर्यंत आघाडी घेणाऱ्या मिल्खाने मागे वळून पाहिले आणि कांस्यपदक एका सेकंदाने हुकले, हा थरार ऐकताना आजही अंगावर शहारे उमटतात. मिल्खा सिंग यांचा जीवनपट पडद्यावरही आलेला आहे. ‘भाग मिल्खा भाग’ या चित्रपटातून त्यांचा जीवनपट मांडण्यात आलेला आहे. या सिनेमात फरहान अख्तरने त्यांची भूमिका साकारलेली आहे. (olympics.com)

TOPICS
भाग मिल्खा भागBhaag Milkha Bhaagमिल्खा सिंगMilkha Singh

Web Title: The flying sikh flying sikh milkha singh death flying sikh milkha singh news milkha singh rare photos bmh

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.