-
आधी आपण काही फोटो पाहूयात… हे फोटो आहेत सध्या टोक्योत सुरु असणाऱ्या ऑलिम्पिकमधील एका स्पर्धेतील.
-
आता हा फोटो पाहिल्यावर डोक्याला हात लावून बसलेली व्यक्ती हरल्यामुळे दु:खी होऊन खाली बसल्यासारखं वाटतं आहे.
-
या फोटोमधून काहीतरी अनपेक्षित घडल्यासारखं वाटतंय.
-
किंवा याच व्यक्तीचा हा फोटो पाहा. यापूर्वी कधीही न घडलेली घटना किंवा काहीतरी फारच अफलातून या व्यक्तीने पाहिल्याचे भाव त्याच्या चेहऱ्यावर आहेत.
-
या फोटोत हीच व्यक्ती प्रेक्षकांकडे बघून ओरडताना दिसतेय.
-
हा ही फोटो त्याच व्यक्तीचा आहे. येथे त्याने आश्चर्याने स्वत:च्या तोंडावर हात ठेवलाय.
-
हा फोटोही त्याच व्यक्तीचा आहे पण इथे तो शांतपणे कोणाला तरी डोळा मारुन ऑल द बेस्ट म्हणताना दिसतोय.
-
सध्या सोशल नेटवर्किंगवर फक्त याच व्यक्तीच चर्चाय आणि या व्यक्तीचं नाव आहे, कार्सटन वारहोम.
-
टोक्यो ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या कार्सटनची चर्चा होण्याचं कारण अर्थात त्याने केलेली कामगिरीच आहे. पण यामागे आणखीनही तीन खास कारणं आहेत.
-
पहिलं कारणं म्हणजे पुरुषांच्या ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीमध्ये कार्सटनने सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं.
-
दुसरं कारण म्हणजे हे सुवर्णपदक स्वत:च्या नावावर करताना त्याने विश्वविक्रमी कामगिरी केलीय.
-
एका सेंकदांच्या अंतराने कार्सटनने विश्वविक्रम मोडीत काढला.
-
दोन वेळा जागतिक विजते राहिलेल्या कार्सटनने मंगळवारी ४५.९४ सेकंदात अंतिम शर्यत पूर्ण केली.
-
कार्सटनने यापूर्वी एक जुलै रोजी ओस्लोमध्ये ४६.७० सेकंदांचा विश्वविक्रम प्रस्थापित केलेला.
-
मात्र आजच्या कामगिरीने कार्सटननेच स्वत:चा हा विक्रम मोडीत काढलाय.
-
याच शर्यतीमध्ये रौप्य पदक जिंकणाऱ्या बेजामिनने ४६.१७ सेकंदांचा वेळ घेत आपल्या स्वत:चा जुना विक्रम मोडीत काढला.
-
ब्राझीलच्या एलिसन डोस सांतोसने या शर्यतीमध्ये कांस्य पदकावर नाव कोरलं. डोसने ४६.७२ सेकंदांमध्ये शर्यत पूर्ण केली. त्याने ०.०२ सेकंद आधी शर्यत पूर्ण केली असती तर एकाच वेळी सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदक जिंकणाऱ्या तिन्ही खेळाडूंनी विश्वविक्रम मोडण्याचा अनोखा योगायोग जुळून आला असता. तरी ही डोसची सर्वोत्तम कामगिरी ठरली.
-
शर्यत जिंकल्यानंतर कार्सटनला त्याने स्वत:चाच विक्रम मोडल्याचं समजलं.
-
त्यानंतर कार्सटनने केलेलं सेलिब्रेशन हे हा सामना लक्षात राहण्यामागील तिसरं कारण ठरलं.
-
आपण केवळ सुवर्णपदकच जिंकलो नाहीय तर विश्वविक्रमही केल्याचं समजल्यावर कार्सटनने सुपरमॅनप्रमाणे आपली जर्सी फाडून आनंद व्यक्त केला.
-
कार्सटनने अंगावरील जर्सी फाडून ओरडत आनंद साजरा केला.
-
कार्सटनच्या या कामगिरीचा आणि आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनचा व्हिडीओ सध्या सोशल नेटवर्किंगवर व्हायरल होताना दिसत आहे.
-
या शर्यतीचं विशेष म्हणजे यामध्ये सहभागी झालेल्या सातपैकी सहा खेळाडूंनी आपले राष्ट्रीय विक्रम मोडले.
-
एवढ्या मोठ्या संख्येने कोणत्याही एकाच शर्यतीत एवढे विक्रम होण्याची ही मागील काही वर्षांमधील पहिली वेळ असल्याचंही सांगितलं जात आहे.
-
कार्सटन हा या शर्यतीमधील फेव्हरेट होता. तो नक्कीच ही शर्यत जिंकेल असं मानलं जात होतं. मात्र त्याने विश्वविक्रमी कामगिरी करत चाहत्यांनाच नाही स्वत:लाही आश्चर्याचा धक्का दिलाय.
-
कार्सटन बराच वेळ पोडियमवर उभा राहून स्वत:च्या गोल्ड मेडलकडे अशाप्रकारे पाहत होता. (सर्व फोटो : रॉयटर्स, एपी, ट्विटर आणि व्हिडीओवरुन स्क्रीनशॉर्ट)
४५.९४ सेकंदांचा खेळ सारा… जगभरात व्हायरल होणाऱ्या या खेळाडूच्या फोटोंमागील तीन कारणं जाणून घ्या
सध्या त्याचे फोटो सोशल नेटवर्किंगवर तुफान व्हायरल होत आहेत, त्यामागे तीन प्रमुख कारणं आहेत
Web Title: Photos olympic karsten warholm breaks 400m hurdles record and karsten warholm celebration scsg