• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. happy birthday shardul thakur life changed because of ms dhoni adn

HBD LORD: वजनानं जास्त असलेला, सचिनच्या जर्सीमुळं ट्रोल झालेला अन् धोनीमुळं ट्रॅकवर परतलेला खेळाडू!

‘पालघर एक्स्प्रेस’ शार्दुल ठाकूर आज आपला ३० वा वाढदिवस साजरा करत आहे.

Updated: October 16, 2021 12:11 IST
Follow Us
  • भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आज आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. शार्दुल ठाकूरच्या टीम चेन्नई सुपर किंग्जने कालच आयपीएल २०२१ चे विजेतेपद पटकावले. शार्दुलने चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.
    1/7

    भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू शार्दुल ठाकूर आज आपला ३०वा वाढदिवस साजरा करत आहे. शार्दुल ठाकूरच्या टीम चेन्नई सुपर किंग्जने कालच आयपीएल २०२१ चे विजेतेपद पटकावले. शार्दुलने चेन्नईच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

  • 2/7

    शार्दुल ठाकूरचा जन्म १६ ऑक्टोबर १९९१ रोजी महाराष्ट्रातील पालघर येथे झाला. गेल्या एका वर्षात शार्दुल ठाकूरने कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी केली आहे. शार्दुलने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिस्बेन कसोटी आणि इंग्लंडविरुद्ध ओव्हल कसोटीत भारताचा विजय सुनिश्चित केला. आयपीएलच्या या हंगामात शार्दुलने चेन्नईसाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या. त्याने १६ सामन्यात २१ विकेट्स घेतल्या.

  • 3/7

    मुंबईच्या या अष्टपैलूने भारतासाठी २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पदार्पण केले. पुढच्या वर्षी त्याचा त्याचा टी-२० संघात समावेश झाला. शार्दुल २०१८मध्ये जेतेपद जिंकलेल्या चेन्नई सुपर किंग्जचा भाग होता. शार्दुलने २०१८ मध्ये कसोटी पदार्पण केले पण नंतर त्याला संघात परतण्यास २ वर्षे लागली.

  • 4/7

    एका मुलाखतीत शार्दुलने खुलासा केला होता, ”जेव्हा मी कसोटी संघाबाहेर होतो, तेव्हा महेंद्रसिंह धोनीमुळेच मला मदत मिळाली. जेव्हा जेव्हा धोनी आपला अनुभव सांगतो, तेव्हा आपल्याला काहीतरी शिकण्यासारखे असते. ती अशा प्रकारची व्यक्ती आहे, जी दररोज काहीतरी सांगते आणि जर तुम्ही त्यातून शिकण्यासाठी पुरेसे हुशार असाल तर तुम्ही शिकत रहाल. दररोज, आपण काहीतरी शिकाल.”

  • 5/7

    शार्दुलच्या आयपीएलमधील शानदार कामगिरीमुळे त्याला टी-२० विश्वचषक संघातही स्थान मिळाले. यापूर्वी त्याची राखीव खेळाडू म्हणून निवड झाली होती. जर हार्दिक पांड्या गोलंदाजी करत नसेल, तर शार्दुल वर्ल्डकपमध्ये अष्टपैलू म्हणून खेळणार हे निश्चित आहे.

  • 6/7

    शार्दुल ठाकूर मुंबईच्या क्रिकेट वर्तुळात ‘पालघर एक्सप्रेस’ म्हणून ओळखला जातो. एकदा जास्त वजन असल्यामुळे त्याला मुंबई संघातून वगळण्यात आले. त्याने रणजी करंडक २०१४-१५च्या हंगामात सर्वाधिक ४८ विकेट्स घेतल्या.

  • 7/7

    शार्दुल ठाकूरने पदार्पण सामन्यात सचिन तेंडुलकरची १० नंबरची जर्सी घातली होती. यामुळे त्याला सोशल मीडियावर खूप ट्रोल करण्यात आले. यानंतर त्याने ५४ क्रमांकाची जर्सी वापरण्यास सुरुवात केली. आता तो ‘लॉर्ड’ म्हणून प्रसिद्ध आहे.

TOPICS
टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024लॉर्ड ठाकूर

Web Title: Happy birthday shardul thakur life changed because of ms dhoni adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.