• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. on this day sachin tendulkar completes 30 thousand runs in international cricket adn

PHOTOS: आठवतोय का १२ वर्षांपूर्वीचा ‘तो’ दिवस? आजच्याच दिवशी सचिननं रचला होता कोणीही तोडू न शकणारा महाविक्रम!

सचिननंतर अनेक दिग्गज फलंदाज क्रिकेटमध्ये आले, पण एकालाही ‘त्या’ विक्रमाच्या जवळ पोहोचता आले नाही.

November 20, 2021 12:08 IST
Follow Us
  • जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर आणि त्याच्या चाहत्यांसाठी २० नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. १२ वर्षांपूर्वी या मास्टर ब्लास्टरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता, जो कोणताही फलंदाज मोडू शकला नाही. सचिनने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३० हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. सध्या फक्त विराट कोहलीच तेंडुलकरच्या या विक्रमाच्या जवळ जाऊ शकतो.
    1/6

    जगातील महान फलंदाजांपैकी एक असलेल्या सचिन तेंडुलकर आणि त्याच्या चाहत्यांसाठी २० नोव्हेंबर हा दिवस खूप खास आहे. १२ वर्षांपूर्वी या मास्टर ब्लास्टरने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला होता, जो कोणताही फलंदाज मोडू शकला नाही. सचिनने श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात ३० हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या. हा टप्पा गाठणारा सचिन एकमेव खेळाडू आहे. सध्या फक्त विराट कोहलीच तेंडुलकरच्या या विक्रमाच्या जवळ जाऊ शकतो.

  • 2/6

    सचिनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत २०० कसोटी सामन्यात १५९२१ धावा, ४६३ एकदिवसीय सामन्यात १८४२६ आणि एकमेव टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात १० धावा केल्या. त्याने कसोटीत ४६, एकदिवसीय सामन्यात १५४ विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ६६४ सामन्यांमध्ये एकूण ३४३५७ धावा केल्या आहेत. त्याने १०० शतके आणि १६४ अर्धशतके केली आहेत.

  • 3/6

    सचिनचा विक्रम मोडणे जवळपास अशक्य आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांच्या यादीत मास्टर ब्लास्टरनंतर कुमार संगकारा येतो, ज्याच्या एकूण २८०१६ धावा आहेत. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग आहे, ज्याने २७४८३ धावा केल्या आहेत. यानंतर महेला जयवर्धने (२५५३४), जॅक कॅलिस (२५९५७) आणि राहुल द्रविड (२४२द८) यांचा क्रमांक लागतो.

  • 4/6

    सध्या खेळत असलेल्या क्रिकेटपटूंमध्ये फक्त विराट कोहली २० हजारांहून अधिक धावा करू शकला आहे. कोहलीने ४४५ सामन्यांमध्ये २३१६१ धावा केल्या आहेत. त्याने ७० शतके आणि ११८ अर्धशतके केली आहेत. कोहली केवळ ३३ वर्षांचा आहे आणि त्याचा फिटनेसही जबरदस्त आहे.

  • 5/6

    विराट कोहली गेल्या दोन वर्षांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावण्यात अपयशी ठरला आहे. एकेकाळी सचिनचा शंभर शतकांचा विक्रम तो सहज मोडेल असे वाटत होते. कोहली अजूनही पाच-सहा वर्षे सहज क्रिकेट खेळू शकतो. त्याच्याकडे १०० शतके आणि ३० हजार धावा करण्याची संधी आहे.

  • 6/6

    मात्र, सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावांचा विक्रम मोडणे कोहलीसाठी खूप अवघड आहे. सचिनचा विक्रम मोडण्यासाठी त्याला आणखी १११९६ धावा कराव्या लागतील.

TOPICS
क्रिकेटCricketदेवGod

Web Title: On this day sachin tendulkar completes 30 thousand runs in international cricket adn

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.