-
आयपीएलच्या पंधराव्या हंगामाताली १९ वा सामना चांगलाच अटीतटीचा झाला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स या संघात रोमहर्षक लढत झाली. दरम्यान हा सामना दिल्ली कॅपिटल्सने जिंकून कोलकाता संघाला पराभवाची धूळ चारली.
-
हा सामना दिल्लीने जिंकलेला असला तरी या सामन्यातील केकेआरच्या एका चाहतीची चांगलीच चर्चा होत आहे. या सामन्यात आरती बेदी नावाची मिस्ट्री गर्ल एका क्षणात व्हायरल झाली आहे.
-
आरती बेदी नावाची ही तरुणी कोलकाता नाईट रायडर्सची चाहती असल्याचे म्हटले जात आहे. सामना सुरु असताना कॅमेरामॅनने या तरुणीचे हावभाव कॅमेऱ्यात कैद केले आणि ही तरुणी क्षणात व्हायरल झाली.
-
सोशल मीडियावर ही मिस्ट्री गर्ल कोण अशी चर्चा झाल्यानंतर नेटकऱ्यांनी या तरुणीचे नाव शोधून काढले आहे. विशेष म्हणजे नाव समजल्यानंतर ही तरुणी एक अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर या तरुणीचे ३१ हजारपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
-
आरती बेदी या मिस्टरी गर्लने आतापर्यंत अनेक जाहिरातींमध्ये काम केलेले आहे. तिने अनेक प्रसिद्ध कंपन्यांच्या उत्पदानाच्या जाहिराती केल्या आहेत.
-
दरम्यान, या सामन्यात केकेआरचा पराभव झालेला असला तरी केकेआरच्या या चाहतीची अजूनही चर्चा होत आहे. केकेआरसमोर दिल्लीने २१६ धावांचे लक्ष्य उभे केले होते. मात्र ही धावसंख्या गाठताना केकेआरची दमछाक झाली. दिल्लीला फक्त १७१ धावा करता आल्या.
दिल्ली-कोलकाता सामन्यातील मिस्ट्री गर्लची सर्वांना भुरळ; तरुणी निघाली अभिनेत्री, पाहा ग्लॅमरस फोटो
ही तरुणी एक अभिनेत्री असल्याचं समोर आलं आहे. इन्स्टाग्रामवर या तरुणीचे ३१ हजारपेक्षाही जास्त फॉलोअर्स आहेत.
Web Title: Ipl 2022 dc vs kkr mystery girl aarti bedi is actress see stunning photo prd