-
२९ मे रोजी आयपीएल २०२२ चा अंतिम सामना होणार आहे. गुजरात टायटन्सने १४ पैकी १० सामने जिंकून अव्वल स्थानावर बाजी मारली आहे. पण षटकार मारण्याच्या बाबतीत या संघाची स्थिती सर्वात वाईट आहे. गुजरात टायटन्सने आतापर्यंत १४ सामन्यांत केवळ ६९ षटकार मारले आहेत. षटकार मारण्याच्या बाबतीत गुजरात टायटन्स हा संघ १० व्या क्रमांकावर आहे. जाणून घ्या IPL 2022 मध्ये कोणत्या संघाने किती षटकार मारले?
-
यावर्षी आयपीएलमध्ये आतापर्यंत सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत राजस्थान रॉयल अव्वल स्थानावर आहे. या संघाने १४ सामन्यात ११६ षटकार मारले आहेत.
-
दुसऱ्या क्रमांकावर कोलकाता नाईट रायडर्स असून या संघाने १४ सामन्यात ११३ षटकार ठोकले आहेत.
-
पंजाब किंग्स संघाने १४ सामन्यात ११० षटकार लगावले आहेत.
-
दिल्ली कॅपिटल्सने १४ सामन्यात १०६ षटकार मारले आहेत.
-
चेन्नई सुपर किंग्जने १४ सामन्यात १०३ षटकार ठोकले आहेत.
-
केएल राहुलच्या नेतृत्वाखालील लखनऊ सुपर जायंट्सने १४ सामन्यात १०१ षटकार लगावले आहेत.
-
मुंबई इंडियन्सने यंदाच्या आयपीएलमध्ये १४ सामन्यांपैकी केवळ ४ सामने जिंकले आहे. असं असलं तरी या संघाने यंदा तब्बल १०० षटकार मारले आहेत.
-
सनरायझर्स हैदराबाद संघाने १४ सामन्यांत केवळ ९७ षटकार ठोकले आहेत.
-
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडे एकापेक्षा एक सरस खेळाडू आहेत. पण या संघाने १४ सामन्यांत केवळ ८६ षटकार मारले आहेत. (सर्व फोटो: सोशल मीडियावरून साभार)
IPL 2022: षटकार मारण्यात गुजरात टायटन्स ठरली सुपर फ्लॉप, जाणून घ्या कोणत्या संघाने किती मारले षटकार
२९ मे रोजी आयपीएल २०२२ चा अंतिम सामना होणार आहे. गुजरात टायटन्सने १४ पैकी १० सामने जिंकून अव्वल स्थानावर बाजी मारली आहे.
Web Title: Ipl 2022 gujarat titans flop in hitting sixes know which team hit how many sixes rmm