-
स्टार स्पोर्टस’च्या ‘गेम प्लान’ या कार्यक्रमात आशिया कपच्या पार्श्वभूमीवर कोहलीला यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
-
भारत आणि पाकिस्तानदरम्यान २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या हाय व्होल्टेज सामन्याआधीच विराटने आपल्या कामगिरीसंदर्भात स्पष्टपणे काही गोष्टी सांगितल्या आहेत.
-
तीन वर्ष शतक झळकावता आलं नाही याबद्दल विचारलं असता, ‘‘या गोष्टींचा विचार करत बसणे मला पटत नाही,” असं उत्तर विराटने दिलं.
-
“माझे तंत्र चुकत असल्याचीही चर्चा आहे. पण, असं काही नाहीय,” असंही विराटने यावेळी स्पष्ट केलं आहे.
-
“माझा खेळ कसा आहे आणि मी कसा खेळतोय, याची मला पूर्ण माहिती आहे,” असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.
-
“वेगवेगळ्या गोलंदाजांचा सामना करण्याची आणि परिस्थितीनुसार खेळण्याची क्षमता माझ्यात होती म्हणूनच मी आंतरराष्ट्रीय स्तरावर इतकी वर्षे टिकू शकलो,’’ असंही विराट म्हणाला.
-
‘माझ्याकडे क्षमता होती, त्यानुसार मी त्यावर मात केली,” असं विराटने आत्मविश्वासाने सांगितलं.
-
“या कालावधीने मला वेगळाच अनुभव दिला. मला काय करता येऊ शकते, हे शिकायला मिळाले,” असं विराटने या बॅड पॅचबद्दल मत व्यक्त केलं.
-
क्रिकेटमधील माझ्या प्रदीर्घ अपयशाचे खास असे कारण नाही, असं विराटने म्हटलं आहे.
-
मात्र परिस्थितीचा सामना करण्याची क्षमता नसती, तर मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टिकलोच नसतो, असंही त्याने आपली बाजू मांडताना सांगितलं.
-
“माझ्यासाठी हे सगळे सोपे होते. मला आणखी शिकायचे आहे,” असंही त्याने सांगितलं.
-
“आशिया चषकासाठी मी सज्ज झालो आहे. माझ्यासमोर सातत्य दाखवण्याचे आव्हान आहे,” असंही माजी कर्णधाराने म्हटलं आहे.
-
“यातून बाहेर पडण्यासाठी आजपर्यंतचा अनुभव कामी येईल,’’ असा विश्वासही कोहलीने व्यक्त केला.
-
“एक खेळाडू आणि माणूस म्हणून माझे महत्त्व काय आहे, ते मला समजून घ्यायचे आहे,” असंही विराट म्हणाला.
-
भारत आणि पाकिस्तानमधील सामना २८ ऑगस्ट रोजी असून दुबईमध्ये हा सामना खेळवला जाणार आहे.
-
भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेसात वाजता हा सामना खेळवला जाणार आहे.
-
विराट या सामन्यामध्ये कसा खेळणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. विराटने व्यक्त केलेला विश्वास पाहता तो या मालिकेत कमबॅक करेल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
