• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. photo virat kohali century against afganistan in t20 asia cup 2022 spb

PHOTOS : ७१व्या आंतरराष्ट्रीय शतकासाठी कोहलीला पाहावी लागली तब्बल ‘इतक्या’ दिवसांची वाट

विराट कोहलीने आज आपल्या कारकिर्दीतील ७१वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले.

September 8, 2022 23:50 IST
Follow Us
  • यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील आज (८ सप्टेंबर) भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना चांगलाच संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने दमदार शतकी खेळी केली. ( फोटो - आयसीसी )
    1/6

    यूएईमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक स्पर्धेतील आज (८ सप्टेंबर) भारत-अफगाणिस्तान यांच्यातील सामना चांगलाच संस्मरणीय ठरला. या सामन्यात भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली याने दमदार शतकी खेळी केली. ( फोटो – आयसीसी )

  • 2/6

    त्याने १२२ धावा करत अफगाणिस्तान संघाला जेरीस आणले. दरम्यान या कामगिरीसाठी विराटला तब्बल १०१९ दिवसांची वाट पाहावी लागली. विराटचे हे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक आहे. ( फोटो – आयसीसी )

  • 3/6

    मागील बऱ्याच काळापासून विराट कोहली धावा काढण्यासाठी झुंजत होता. अनेक प्रयत्न करूनही त्याला धावा करता येत नव्हत्या. मात्र अखेर आज त्याने आपल्या कारकिर्दीतील ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक झळकावले आहे. ( फोटो – आयसीसी )

  • 4/6

    अफगाणिस्तानविरोधातील सामन्यात तब्बल १०१९ दिवसांनी त्याने ही कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे धावा करण्यात अपयशी ठरत असल्यामुळे त्याच्यावर टीका केली जात होती. विराटने काही दिवसांसाठी आराम करावा असा सल्लाही दिला जात होता. मात्र आता तो पुन्हा एकदा चांगली कामगिरी करताना दिसत असून त्याची प्रचिती आज आली आहे. ( फोटो – आयसीसी )

  • 5/6

    त्याने आपले शतक ११ चौकार आणि चार षटकार लगावत पूर्ण केले. आपल्या पूर्ण खेळीत त्याने ६१ चेंडूंमध्ये १२ चौकार आणि ६ षटकार लगावत १२२ धावा केल्या. ( फोटो – आयसीसी )

  • 6/6

    दरम्यान, याच महिन्यात टी-२० विश्वचषक स्पर्धेळा सुरुवात होणार आहे. ही स्पर्धा सुरू होण्याआधी कोहली पुन्हा एकदा फॉर्ममध्ये आले आहे. विराटने हाच खेळ कायम ठेवत टी-३० विश्वचषक स्पर्धेत धडाकेबाज कामगिरी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विराटचे आजचे ७१ वे आंतरराष्ट्रीय शतक असून सचिन तेंडुलकरच्या शतकांची संख्या १०० आहे. तसेच रिकी पॉँटिंगच्या शतकांची संख्या ७० आहे. ( फोटो – आयसीसी )

TOPICS
आशिया चषक २०२४Asia Cup 2023विराट कोहलीVirat Kohli

Web Title: Photo virat kohali century against afganistan in t20 asia cup 2022 spb

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.