• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. roger federer retirement richest players in the world forbes list check federer net worth house and cars svs

Roger Federer Retirement: श्रीमंत खेळाडूंच्या यादीत रॉजर फेडरर सातवा; आलिशान घर व गाड्यांसह इतकी आहे संपत्ती

Roger Federer Net Worth: २०२१ मध्ये फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फेडरर सातव्या क्रमांकावर आहे.

September 16, 2022 16:50 IST
Follow Us
  • Roger Federer Net Worth, House and Awards
    1/9

    रॉजर फेडररने स्पर्धात्मक टेनिसमधून निवृत्त होण्याची घोषणा केली आहे. टेनिसप्रेमींची एक अक्खी पिढी घडवणारा फेडररने २४ वर्षांच्या यशस्वी कारकीर्दीनंतर ब्रेक घेतला आहे.

  • 2/9

    ४१ वर्षीय फेडरर हा जगातील सर्वात यशस्वी व सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे.

  • 3/9

    फेडररने आपल्या कारकीर्दीत एकूण २० ग्रँड स्लॅम किताब जिंकले आहेत. राफेल नडाल व नोवाक जोकोविचला मागे टाकत त्याने ८ वेळा विम्बल्डन, ६ ऑस्ट्रेलियन ओपन व ५ वेळा युएस ओपन व एकदा फ्रेंच ओपन मध्ये विजय मिळवला आहे.

  • 4/9

    २०२१ मध्ये फोर्ब्सने जारी केलेल्या जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत टेनिसपटू फेडरर हा सातव्या क्रमांकावर आहे.

  • 5/9

    फेडररची एकूण संपत्ती ५५० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ४३७२ कोटी रुपये आहे. यातील १०३७ कोटी रुपये हे त्याने ग्रँड स्लॅमसारख्या स्पर्धांमधून विजयी होत कमावले आहेत.

  • 6/9

    स्वित्झर्लंडमध्ये फेडररचे आलिशान व अत्यंत सुंदर घर आहे. इतकेच नव्हे तर दुबईमध्ये सुद्धा त्याचा मोठा बंगला आहे.

  • 7/9

    स्वित्झर्लंडच्या ज्युरिख येथील जवळपास दीड एकरात बनवलेल्या घरासाठी फेडररने तब्बल ६५ लाख पौंड खर्च केला होता.

  • 8/9

    फेडररला महागड्या गाड्यांची विशेष आवड आहे. त्याच्या कलेक्शन मध्ये ६ आलिशान गाड्या आहेत.

  • 9/9

    ऑटोबीजच्या रिपोर्टनुसार, फेडररकडे ५ मर्सिडीज व एक रेंज रोव्हर गाडी आहे.

  • (सर्व फोटो: इंस्टाग्राम)
TOPICS
क्रीडाSportsटेनिसTennisस्पोर्ट्स न्यूजSports News

Web Title: Roger federer retirement richest players in the world forbes list check federer net worth house and cars svs

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.