• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 world cup 2022 crushing new zealands dreams pakistan enters in final of t20 world cup 2022 with superb style hd import avw

T20 World Cup 2022: न्यूझीलंडच्या स्वप्नांना सुरुंग लावत पाकिस्ताने केला अंतिम सामन्यात दिमाखात प्रवेश

न्यूझीलंड विरुद्ध पाकिस्तान संघात टी२० विश्वचषक २०२२ मधील पहिला उपांत्य फेरीचा सामना खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तानने बाबर-रिझवानच्या अर्धशतकाच्या जोरावर ७ विकेट्सने विजय मिळवला. त्याचबरोबर टी२० विश्वचषक २०२२ च्या अंतिम फेरीत पोहचणारा पहिला संघ ठरला.

Updated: November 9, 2022 21:36 IST
Follow Us
  • टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला, जो पाकिस्तानने ७ विकेट्स राखून नावावर केला. पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत कशीबशी जागा मिळवली आणि आता उपांत्य सामना जिंकलत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली.
    1/10

    टी२० विश्वचषक २०२२ स्पर्धेत अंतिम सामना खेळणारा पहिला संघ ठरला. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात बुधवारी विश्वचषक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना खेळला, जो पाकिस्तानने ७ विकेट्स राखून नावावर केला. पाकिस्तान संघाने उपांत्य फेरीत कशीबशी जागा मिळवली आणि आता उपांत्य सामना जिंकलत अंतिम सामन्यात धडक मारली आहे. दुसरीकडे न्यूझीलंडची मात्र पुन्हा एकदा निराशा झाली.

  • 2/10

    पाकिस्तानचा कर्णदार बाबर आझम टी२० विश्वचषक २०२२ मध्ये उपांत्य सामन्यापूर्वी खराब फॉर्ममध्ये दिसला होता. पण उपांत्य सामन्यात त्याची बॅट पुन्हा एकदा तळवली. बाबर मोहम्मद रिजवान याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि अर्धशतक ठोकले. 

  • 3/10

    पाकिस्तानला नशिबाची साथ लाभली. नेदरलॅंड्सने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केल्याने पाकिस्तानच्या उपांत्य फेरीच्या आशा जिंवत राहिल्या. तसेच त्यांनी शेवटच्या साखळी सामन्यात बांगलादेशचा पराभव करत उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले. रविवारी अंतिम फेरीत भारत किंवा इंग्लंड यांच्याबरोबर मेलबर्नला पाकिस्तान सामना खेळणार आहे.

  • 4/10

    बाबर मोहम्मद रिजवान याच्यासोबत डावाची सुरुवात करण्यासाठी आला आणि अर्धशतक ठोकले. रिजवानने देखील अर्धशतक पूर्ण करत पाकिस्तानच्या विजयात महत्वाची भूमिका बजावली. बाबरने एकूण ४२ चेंडू खेळले आणि ५३ धावा करून बाद झाला. ट्रेंट बोल्टने त्याला झेलबाद केले. दुसरीकडे मोहम्मद रिजवानने ४३ चेंडूत ५७ धावांची सर्वात मोठी खेळी केली.

  • 5/10

    आकाश चोप्रा आणि हरभजन सिंग यादोघांनीही त्याला प्रश्न विचारला. “बाबर, रिझवान आणि शाहीन आफ्रिदी तुमची तिकडी आता फॉर्ममध्ये आली आहे.” यावर त्याचे मत त्यांनी त्याला विचारले. रिझवान म्हणाला की, “ शाहीन आफ्रिदी आज खूप दिवसांनी लयीत गोलंदाजी करताना दिसला. तो पाकिस्तान संघाचा एक मोठा अॅसेट आहे.

  • 6/10

     शाहीन शाह आफ्रिदीने शानदार गोलंदाजी करत न्यूझीलंडला पहिल्याच षटकात मोठा धक्का दिला. स्पर्धेला सुरुवात झाल्यापासून न्यूझीलंड संघ आपण उपांत्य फेरीतील प्रबळ दावेदार असल्याचे दाखवत होता. मात्र पाकिस्तानने सामन्यात जीव फुंकत तो रंगतदार स्थितीत आणला.पहिल्याच षटकात फिन ऍलनला जबरदस्त चेंडूवर पायचीत करत पहिला धक्का दिला. तर केन विलियम्सनला ४६ धावांवर मोक्याच्या क्षणी त्रिफळाचीत करत मोठा ब्रेक थ्रू दिला.

  • 7/10

    न्यूझीलंडसाठी त्यांचा कर्णधार केन विलियन्सन याने मोठी खेळी केली. पण त्याचा स्ट्राईक रेट अवघा १०९.५२चा होता. विलियन्सनने ४२ चेंडूत एक चौकार आणि एक षटकराच्या मदतीने ४६ धावा केल्या, पण त्याची ही खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही. दुसरीकडे न्यूझीलंडचा मध्यक्रमातील फलंदाज डॅरिल मेचेल याने ३५ चेंडूत नाबाद ५३ धावा . नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेणाऱ्या न्यूझीलंडने मर्यादित २० षटकांमध्ये ४ विकेट्सच्या नुकसानावर १५२ धावां उभ्या केल्या.

  • 8/10

     इरफान पठाणने त्याच्या या शानदार अर्धशतकी खेळीवर प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्याने तो व्यक्त होत झाला. रिझवान म्हणाला की, “ हे सर्वकाही अल्लाह आमच्याकडून करून घेतो. प्रत्येकाच्या आयुष्यात एक वाईट काळ येत असतो. माझी आणि बाबरची फलंदाजी फारशी काही दिवस झाले फारशी चांगली होत नव्हती. पण महत्वाच्या सामन्यात आम्ही स्वतः वर विश्वास ठेवला आणि मोठे फटके खेळण्यास सुरुवात केली. आज दिवस आमचा होता. 

  • 9/10

    बाबर आझमनंतर मोहम्मद रिझवाननेही आपले अर्धशतक पूर्ण केले. अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानसाठी ही खूप आनंदाची बातमी आहे. दोन्ही स्टार फलंदाज संघाच्या लयीत आले आहेत. हे दोघेही या विश्वचषकात खराब फॉर्मशी झुंज देत होते, परंतु अंतिम सामन्यापूर्वी ते प्रकाश झोतात आले आहेत. रिझवानने ४३ चेंडूत ५७ धावा केल्या. 

  • 10/10

    इरफान आणि जतीन यांनी त्याला जाता जाता एक प्रश्न विचारला की, “तुला भारतासोबत खेळायला आवडेल का इंग्लंड बरोबर? यावर त्याने कुठेही मागचा पुढचा विचार न करता भारत असे उत्तर दिले. जगात कुठेही क्रिकेटचा चाहता असो त्याला भारत-पाकिस्तान यांच्यातच सामना पाहायला आवडेल आणि मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की भारत देखील अंतिम सामन्यात मेलबर्नला खेळायला येईल.”

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटी २० विश्वचषक २०२२T20 World Cup 2022टी-२० वर्ल्ड कप २०२४T20 World Cup 2024

Web Title: T20 world cup 2022 crushing new zealands dreams pakistan enters in final of t20 world cup 2022 with superb style hd import avw

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.