• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • आजचा जोक
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • राहुल गांधी
  • देवेंद्र फडणवीस
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer rishabh pant car accident in uttarakhand car catch fire photos scsg

Rishabh Pant Car Accident Photos: काळ आला होता पण…; क्षणात खाक झाली पंतची स्पोर्ट्स कार; रुग्णालयातील फोटोही आले समोर

Rishabh Pant Car Accident Updates: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतचे प्राण एका भीषण अपघातामधून थोडक्यात बचावले, पंतची गाडी पूर्णपणे जळून खाक झाली

Updated: December 30, 2022 14:00 IST
Follow Us
  • Cricketer Rishabh Pant Car Accident in Uttarakhand Photos
    1/18

    Cricketer Rishabh Pant Car Accident Health Updates: भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे.

  • 2/18

    दिल्लीहून घरी येत असताना पंतच्या स्पोर्ट्स कारला हा भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे.

  • 3/18

    सध्या पंतवर देहरादूनमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरु असून त्याला पुढील उपचारांसाठी दिल्लीला पाठवण्यात येणार आहे.

  • 4/18

    मंगळूरु आणि निरसन मार्गावर पंतच्या गाडीला अपघात झाला.

  • 5/18

    हरिद्वार जिल्ह्यामध्ये हा अपघात झाल्यानंतर पंतला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आलं असून त्याच्यावर रुरकी प्रशासकीय रुग्णालयात प्राथमिक उपचार करण्यात आले.

  • 6/18

    राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५८ वर हा अपघात झाल्याची माहिती पोलीस निरीक्षक स्वपन किशोर यांनी दिली.

  • 7/18

    हम्मदपुर झाल येथील एका वळणावर भरधाव वेगात असलेल्या ऋषभ पंतच्या कारचा अपघात झाला.

  • 8/18

    डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभ पंतच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली आहे. पंतची  प्रकृती स्थिर असून, त्याच्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

  • 9/18

    उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी पंतच्या अपघातानंतर अधिकाऱ्यांना त्याच्या उपचारासाठी सर्व सुविधा पुरवण्याचे निर्देश दिलेत.

  • 10/18

    सरकारकडून पंतच्या उपचारासंदर्भात सर्व काळजी घेतली जाईल असं उत्तरखंडच्या मुख्यमंत्र्यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला सांगितलं. गरज पडल्यास पंतसाठी एअर अॅम्ब्युलन्सचीही सेवा पुरवा असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाकडून सांगण्यात आलं आहे.

  • 11/18

    प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ऋषभची कार रेलिंगला धडकल्याने अपघात झाला.

  • 12/18

    रेलिंगला धडकल्यानंतर गाडीने पेट घेतला असंही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं.

  • 13/18

    या गाडीला आग लागल्याचे व्हिडीओ याच मार्गाने प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

  • 14/18

    या व्हिडीओमध्ये रात्रीच्या अंधरात रस्त्यावर डिव्हायडरजवळ गाडी जळत असल्याचं दिसत आहे.

  • 15/18

    हे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसत आहेत.

  • 16/18

    मात्र सुदैवाने पंतला वेळीच गाडीच्या बाहेर काढण्यात यश आल्याने तो थोड्यात बचावला.

  • 17/18

    पंतची ही महागडी गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पंतच्या या अपघातग्रस्त गाडीची अवस्था पाहता काळ होता पण वेळ आली नव्हती याच म्हणीची आठवण होते.

  • 18/18

    गाडीच्या सीटपासून सर्वच गोष्टी जळून राख झाल्या असून हा अपघात कसा झाला याची चौकशी आता केली जात आहे. (सर्व फोटो – सोशल मीडियावरुन साभार)

TOPICS
अपघातAccidentउत्तराखंडUttarakhandऋषभ पंतRishabh PantकारCarकार अपघातCar Accidentक्रिकेट न्यूजCricket News

Web Title: Cricketer rishabh pant car accident in uttarakhand car catch fire photos scsg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.