-
भारताचा तडाखेबाज डावखुरा फलंदाज आणि यष्टिरक्षक ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ऋषभ पंतची मर्सिडीज कार जळून अक्षरश: कोळसा झाली.
-
ऋषभ पंत अपघातात गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर डेहराडूनमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या कपाळाला, पाठीला, गुडघ्याला दुखापत झाली आहे.
-
या अपघातानंतर क्रिकेट जगतासह सर्वच स्तरातील मंडळींनी तो लवकर बरा व्हावा, यासाठी प्रार्थना केली आहे.
-
अपघातावेळी ऋषभ पंत कार चालवत होता आणि कार वेगात होती, असं काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे.
-
शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उत्तराखंडच्या रूरकी-नारसन सीमेवर हम्मदपूर परिसरात हा अपघात झाला.
-
महामार्गावरच्या एका वळणावर ऋषभची कार रस्त्याच्या कडेला असणाऱ्या रेलिंगला धडकली आणि अपघात झाला.
-
यावेळी हरियाणा परिवहन महामंडळाच्या बसवर चालक आणि वाहकाचं काम करणारे सुशील मान आणि परमजीत सिंग यांनी ऋषभला कारमधून वेळीच बाहेर काढलं. त्यानंतर कारनं पेट घेतला.
-
पंतचं डोकं, गुडघ्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसंच पाय मोडला असल्याची शक्यता असून देहरादूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पंतची प्रकृती सध्या स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.
-
ऋषभ पंतच्या गुडघ्याच्या एक्स-रेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एक्स-रेमध्ये पंतच्या गुडघ्याला झालेली दुखापत स्पष्टपणे दिसत आहे. (Photo: abhishereporter/twitter)
-
गुडघ्याच्या दुखापतीमुळे पंतची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते, अशा कमेंट्स त्या फोटोवर केल्या जात आहेत.
-
पंतवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार त्याच्या गुडघ्यात फ्रॅक्चर नाही. ही दुखापत अशी नाही की त्यातून पंतला सावरता येणार नाही.
-
अपघात झाला तेव्हा कारमध्ये ऋषभ पंत एकटाच होता. ते दिल्लीहून रुरकी येथील त्यांच्या घरी जात होते. पंतने सांगितले की, गाडी चालवताना त्याला झोप लागली होती.
-
मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले जात आहे की पंत नवीन वर्ष साजरा करण्यासाठी घरी जात होता. त्याला त्याच्या आईला सरप्राइज द्यायचे होते.
-
दरम्यान, संपूर्ण देश सध्या ऋषभ लवकरात लवकर बरा व्हावा यासाठी प्रार्थना करत आहे. प्रसिद्ध वाळू शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी ऋषभ पंतच्या आरोग्यासाठी आपल्या कलेच्या माध्यमातून प्रार्थना केली आहे. (Sudarsan Pattnaik)
Rishabh Pant Health Update: ऋषभ पंतच्या X-Ray चा फोटो व्हायरल; पुन्हा क्रिकेट खेळण्याच्या शंकेवर डॉक्टर म्हणतात, “ही दुखापत..”
ऋषभ पंतच्या गुडघ्याच्या एक्स-रेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या दुखापतीमुळे पंतची कारकीर्दही संपुष्टात येऊ शकते, अशा कमेंट्स त्या फोटोवर केल्या जात आहेत.
Web Title: Health update rishabh pant x ray photo goes viral doubts about playing cricket again doctor injury car accident fire pvp