Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. cricketer shaheen shah afridi married former cricketer shahid afridis daughter ansha see wedding photos vbm

Shaheen Ansha Wedding: शाहीन शाह आफ्रिदीने माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशासोबत बांधली लग्नगाठ, पाहा PHOTOS

Shaheen Afridi Wedding Photos: वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने माजी पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीची मुलगी अंशा हिच्याशी विवाह केला आहे. दोघांचे लग्न कराचीत झाले. या विवाह सोहळ्या क्रिकेटपटूंसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

February 4, 2023 18:42 IST
Follow Us
  • Shaheen Shah Afridi Married Ansha See Wedding Photos
    1/9

    पाकिस्तान संघाचा स्टार वेगवान गोलंदाज शाहीन आफ्रिदीने लग्न केले आहे. शाहीनने पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीचा मुलगी अंशाला आपली जीवनसाथी बनवली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    दोघांनी ३ फेब्रुवारीला कराचीत लग्नगाठ बांधली.लग्नाच्या एका दिवसानंतर शाहीन आणि अंशाचे एकत्र फोटो समोर येऊ लागले. फोटोंमध्ये दोघेही खूप छान दिसत आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    सोशल मीडियावरही चाहते शाहीन आणि अंशाच्या या जोडीचे कौतुक करत आहेत. एका छायाचित्रात शाहीन वधूच्या जोडीमध्ये उपस्थित असलेल्या अंशाच्या कपाळाचे चुंबन घेताना दिसत आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    दोन वर्षांपूर्वी शाहीन आणि अंशाची एंगेजमेंट झाली होती, पण ती सार्वजनिक करण्यात आली नव्हती. लग्नाला दोन वर्षे लागली कारण या काळात अंशा तिचे शिक्षण पूर्ण करत होती. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    शाहीन आणि अंशाचा लग्नाच्या कार्यक्रम पाकिस्तानचे पोर्ट सिटी असलेल्या कराची शहरात झाला. यामध्ये दोन्ही कुटुंबातील नातेवाईकांव्यतिरिक्त पाकिस्तान संघाचे अनेक खेळाडू पोहोचले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    शाहीन आफ्रिदीच्या लग्नात पाकिस्तान क्रिकेट संघातील सर्व बड्या स्टार्सनी हजेरी लावली होती. कर्णधार बाबर आझमपासून माजी कर्णधार सरफराज खान, नसीम शाह, शोएब मलिकपर्यंत सर्वजण लग्नाच्या फोटोंमध्ये दिसले. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    शाहीन आफ्रिदीने शाहिद आफ्रिदीच्या मुलीशी लग्न केले असेल, पण तरीही पती-पत्नीमधील अंतर कायम आहे. दोघेही त्यांच्या घरी वेगळे राहतील. रुक्षतीची तारीख निश्चित न होणे हे त्यामागचे प्रमुख कारण आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    शाहीन आफ्रिदी बऱ्याच दिवसांपासून दुखापतीशी झुंजत आहे. टी-२० विश्वचषकातही दुखापतीमुळे तो शंभर टक्के देऊ शकला नाही. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    इंग्लंडविरुद्धच्या विजेतेपदाच्या सामन्यात क्षेत्ररक्षण करताना तो जखमी झाला होता. मात्र, तो आगामी पीएसएलमध्ये खेळताना दिसणार आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsपाकिस्तान क्रिकेट टीमPakistan Cricket Teamशाहिद आफ्रिदीShahid Afridiशाहीन आफ्रिदी

Web Title: Cricketer shaheen shah afridi married former cricketer shahid afridis daughter ansha see wedding photos vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.