-
लेग-स्पिनर युजवेंद्र चहलची पत्नी धनश्री वर्मा दंतचिकित्सक आहे. तिने डीवाय पाटील डेंटल कॉलेज, नवी मुंबई येथून तिने शिक्षण घेतले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
अजिंक्य रहाणेची पत्नी राधिका हिने मुंबई विद्यापीठाच्या महाविद्यालयातून पदवी प्राप्त केली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
माजी क्रिकेटपटू सुरेश रैनाची पत्नी प्रियांकाने बी.टेक केले आहे. तिने एक्सेंचर आणि विप्रो सारख्या मोठ्या कंपन्यांमध्ये काम केले आहे. लग्नापूर्वी प्रियांकाने नेदरलँडमध्ये एका बँकेत काम केले होते. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
रवींद्र जडेजाची पत्नी रिवा सोलंकीने राजकोटमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले आहे. गुजरातमधील जामनगर उत्तर मतदारसंघातून भाजपची निवडणूक जिंकून रिवा नुकतीच विधानसभेत पोहोचली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेशन हिने कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.टेक केले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
केएल राहुलचे पत्नी अथिया शेट्टीने मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन स्कूल आणि अमेरिकन स्कूल ऑफ बॉम्बे येथे शिक्षण घेतले आहे. तसेच, तिने फिल्ममेकिंग आणि लिबरल आर्ट्समध्ये पदवी प्राप्त केली आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
विराट कोहलीची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने कला शाखेत पदवी प्राप्त केली आहे. अनुष्काने अर्थशास्त्रात पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
-
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची पत्नी साक्षीने हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला आहे. साक्षीने औरंगाबादच्या इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटमधून शिक्षण घेतले आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)
Cricketers Wives Qualification: अथिया शेट्टीपासून धनश्री वर्मापर्यंत… ‘या’ ९ क्रिकेटर्सच्या पत्नींचे क्वालिफिकेशन घ्या जाणून
Indian Cricketers Wives Qualification: क्रिकेपटू केएल राहुल नुकताच अभिनेत्री अथिया शेट्टीसोबत विवाहबंधनात अडकला आहे. पण बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया किती शिक्षित आहे, हे तुम्हाला माहीत आहे का? चला तर भारतातील ९ स्टार खेळाडूंच्या पत्नींच्या शिक्षणाबद्दल जाणून घेऊया
Web Title: Know the qualifications of wives of indian cricketers from dhanashree verma to athiya shetty vbm