Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. rohit sharma create many records by scoring century in 1st match of border gavaskar series against aus vbm

IND vs AUS: रोहित शर्माचा एक डाव धोबीपछाड! शतकांचा दुष्काळ संपवताना लावली विक्रमांची रांग

Rohit Sharma Records: बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या सामन्यात रोहित शर्माने शानदार शतक झळकावत कसोटी शतकांचा दुष्काळ संपवला. या शतकाच्या जोरावर कर्णधार रोहित शर्माने अनेक विक्रमांची रांग लावली आहे. त्याने २१२ चेंडूत १५ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने १२० धावा केल्या.

Updated: February 10, 2023 19:21 IST
Follow Us
  • List of records of Rohit Sharma
    1/9

    क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधार म्हणून शतक झळकावणारा रोहित हा भारताचा पहिला खेळाडू ठरला आहे. हा पराक्रम भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार धोनी आणि विराटही करता आला नाही. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 2/9

    रोहित शर्मा कर्णधार क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा जगातील चौथा फलंदाज ठरला आहे. त्याच्या अगोदर तिलकरत्ने दिलशान, फाफ डू प्लेसिस आणि बाबर आझम यांनी हा कारनामा केला आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 3/9

    रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सलामीवीर म्हणून भारतासाठी सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. सचिन आणि रोहितने प्रत्येकी ९ शतकं झळकावली आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 4/9

    सक्रिय क्रिकेटपटूंमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत रोहित शर्माने स्टीव्ह स्मिथला मागे टाकले आहे. या लिस्टमध्ये विराट कोहली ७४, डेव्हिड वॉर्नर ४५, जो रूट ४४, रोहित शर्मा ४३ तर स्टीव्ह स्मिथने ४२ शतके झळकावली आहेत. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 5/9

    रोहित शर्माने वीरेंद्र सेहवागची बरोबरी केली. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात कसोटी शतके झळकावणारा, वीरेंद्र सेहवागनंतर रोहित हा दुसरा भारतीय सलामीवीर आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 6/9

    कर्णधार आणि कर्णधार नसताना तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा जगातील एकमेव फलंदाज बनला आहे. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 7/9

    रोहित शर्मा घरच्या मैदानावर कसोटी खेळताना सर्वाधिक सरासरी असणारा जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे. या यादीमध्ये सर डॉन ब्रॅडमॅन (९८.२२), रोहित शर्मा (७५.६६), मार्नस लाबूशेन (७०.५०), क्लायड वालकॉट (६९.८३). (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 8/9

    बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा रोहित हा सातवा भारतीय कर्णधार ठरला आहे. विराट कोहली, सचिन तेंडुलकर, मोहम्मद अझरुद्दीन, सौरव गांगुली, अजिंक्य रहाणे आणि एमएस धोनी यांनी यापूर्वी हा पराक्रम केला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)

  • 9/9

    दहा वर्षांनंतर भारतीय कर्णधाराने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात शतक झळकावले आहे. याआधी २०१३ मध्ये एमएस धोनीने २२४ धावा करताना हा पराक्रम केला होता. (फोटो-सौजन्य ट्विटर)

TOPICS
ऑस्ट्रेलियाAustraliaक्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaरोहित शर्माRohit Sharma

Web Title: Rohit sharma create many records by scoring century in 1st match of border gavaskar series against aus vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.