-
भारतरत्न सचिन तेंडुलकरचा आज ( २४ एप्रिल ) पन्नासावा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात असलेल्या औंढी या गावात गुढ्या आणि तोरणे उभारल्या होत्या. तसेच, सचिनच्या अर्धपुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढत साजरा करण्यात आला.
-
या गावातीलच सचिन जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ’तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत येथे मोठा जल्लोष केला.
-
सचिनच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गावातील प्रत्येक घरी बॅटसह गुढी उभारण्यात आली होती.
-
तर, संपूर्ण गावातील रस्त्यावर रांगोळी काढून कागदाच्या पताका, सचिनचे मोठे पोस्टर लावून गाव सजविण्यात आले होते. हनुमान मंदिरापासून सचिनच्या अर्धपुतळा पालखीत ठेवून गावातून मिरवणुक काढण्यात आली.
-
मिरवणुकीच्या सुरूवातीला गावातील महिलांचे लेझीमपथक होते. हलगी आणि तुतारीच्या निनादात निघालेल्या पालखीवर फुलांची उधळण करण्यात येत होती.
-
सचिनच्या शतकी खेळीची आठवण म्हणून सचिनचे आवडते खाद्य असलेल्या शंभर वडापावचा नैवेद्य पालखीसमोर दाखाविण्यात आला.
-
गावातीलच सचिन जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या तेंडल्या या चित्रपटाचे प्रमोशन यावेळी मुलांच्या माध्यमातून करण्यात आले. यावेळी क्रीडा पत्रकार सुनंदन लेले यांनी आजचा दिवस ‘जागतिक क्रिकेट दिन’ म्हणून साजरा करण्यात येत असल्याचे यावेळी जाहीर केले.
-
पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होत असलेल्या तेंडल्या चित्रपट एक राष्ट्रीय आणि पाच राज्यस्तरीय पुरस्कारांनी सन्मानित झाला आहे.
-
या सिनेमातील अनेक घटना या गावात घडलेल्या असल्याने सचिनचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पध्दतीने साजरा करण्यासाठी औंढी या गावाची निवड करण्यात आल्याचे दिग्दर्शक जाधव यांनी सांगितले.
Photos : सचिनच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक, शंभर वडापावचा नैवेद्य, घरांवर गुढ्या अन्…; ‘या’ गावात मास्टर-ब्लास्टरचा वाढदिवस साजरा
गावातील सचिव जाधव यांनी दिग्दर्शित केलेल्या ’तेंडल्या’ चित्रपटाच्या टीमने एकत्रित येत जल्लोषही केला.
Web Title: Sangali shirawal aundh people celebrate sachin tendulkar 50 th birthday ssa