• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. suryakumar yadav broke rohit sharmas two records and many other players records in ind vwi 3rd t20 vbm

PHOTOS: सूर्याने T20I झळकावले षटकारांचे शतक! रोहित-शिखरला मागे टाकत केले अनेक विक्रम, पाहा यादी

Suryakumar Yadav Records: गयाना येथील प्रोव्हिडन्स स्टेडियमवर झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ७ विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यातील विजयाचा शिल्पकार सूर्याने ८३ धावांची खेळीत करत अनेक विक्रम केले.

August 9, 2023 16:18 IST
Follow Us
  • Suryakumar Yadav Records
    1/9

    भारत आणि वेस्ट इंडिज संघांतील तिसरा टी-२० सामना मंगळवारी पार पडला. या सामन्यात सूर्यकुमार यादवने ४४ चेंडूत ४ षटकार आणि १० चौकारांच्या मदतीने ८३ धावा करत संघाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 2/9

    भारताकडून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १०० षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत आता सूर्यकुमार यादव पहिल्या क्रमांकावर आला आहे. सूर्यकुमार यादवने ४९ डावांमध्ये हा पराक्रम केला आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 3/9

    सूर्यकुमार यादवने रोहित शर्माला मागे टाकत ख्रिस गेलच्या विक्रमाशी बरोबरी केली. सूर्यकुमार यादवच्या नावावर आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ५१ सामन्यांत १०१ षटकार आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 4/9

    सूर्यकुमारला टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये रोहित शर्मापेक्षा अधिक सामनावीर पुरस्कार मिळाले आहेत. सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १२व्यांदा सामनावीराचा किताब जिंकला आणि रोहित शर्माला (११) मागे टाकले. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 5/9

    सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत शिखर धवनला मागे टाकत चौथे स्थान पटकावले. शिखर धवनने १७५९ धावा केल्या आहे, तर सूर्यकुमार यादवच्या १७८० धावा आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 6/9

    सूर्यकुमार आता प्रोव्हिडन्समधील टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारा दुसरा खेळाडू बनला आहे. त्याने महेला जयवर्धनेला (८१) मागे टाकले आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 7/9

    सूर्यकुमार यादव सध्या आयसीसीच्या टी-२० क्रमवारीतील नंबर वन फलंदाज आहे. त्याने ५१ टी-२० सामन्यांच्या ४९ डावांमध्ये १७८० धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतके आणि १४ अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 8/9

    त्याची वनडेत आतापर्यंतची कामगिरी फारशी खास झालेली नाही. सूर्याने आतापर्यंत २६ एकदिवसीय सामन्यांच्या २४ डावात ५११ धावा केल्या आहेत, ज्यात दोन अर्धशतकांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य-ट्विटर)

  • 9/9

    सूर्यकुमार यादवने आतापर्यंत एकमेव कसोटी सामना खेळला आहे. त्यामध्ये सूर्याने ८ धावा केल्या आहेत. (फोटो सौजन्य-ट्विटर)

TOPICS
क्रिकेट न्यूजCricket Newsटीम इंडियाTeam Indiaभारत विरुद्ध वेस्ट इंडिजIND vs WIसूर्यकुमार यादवSuryakumar Yadav

Web Title: Suryakumar yadav broke rohit sharmas two records and many other players records in ind vwi 3rd t20 vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.