-
इशांत शर्माची मेहुणी आकांक्षाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर बेबी शॉवरचे अनेक फोटो शेअर केले आहेत. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
या फोटोंमध्ये इशांत आणि प्रतिमा ही जोडी खूपच सुंदर दिसत आहे. त्या दोघांच्या हातात मॉम आणि डॅडचे फलक आहेत. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
दिल्लीतील इशांत शर्माच्या घरी बेबी शॉवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला बरीच मंडळी उपस्थित होती. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
या पार्टीला दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्याचबरोबर दोघांचे जवळचे मित्रमंडळी हजर होती. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
इशांत शर्मा आणि प्रतिमा यांनी लव्ह मॅरेज केले. प्रतिमा सिंग ही राष्ट्रीय स्तरावरील बास्केटबॉल खेळाडू आहे. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
एकदा प्रतिमा सिंगच्या बास्केटबॉल सामन्यात इशांत शर्मा पाहुणा म्हणून आला होता. तिथून दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
इशांत शर्मा सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून बराच काळ दूर आहे. तो आयपीएल स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करतो. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
टीम इंडियासाठी इशांत शर्माने १९९ सामन्यात प्रतिनिधित्व केले आहे. यामध्ये त्याने ४३४ विकेट्स घेतल्या आहे. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
-
इशांत शर्माने टीम इंडियासाठी शेवटचा कसोटी सामना २०२१ साली खेळला आहे. हा सामना न्यूझीलंडविरुद्ध ग्रीन पार्क येथे खेळला होता. (फोटो सौजन्य-जनसत्ता)
PHOTOS: लग्नाच्या सहा वर्षांनंतर इशांत शर्माच्या घरी आली आनंदाची बातमी, लवकरच कुटुंबात होणार नवीन पाहुण्याची एन्ट्री!
Ishant And Pratibha To Be Parents: लग्नाच्या ६ वर्षांनंतर क्रिकेटर इशांत शर्माच्या घरी आनंदाची बातमी येणार आहे. त्यांची पत्नी प्रतिमा सिंग गरोदर आहे. अलीकडेच त्यांच्या घरी बेबी शॉवरचा कार्यक्रम पार पडला. बेबी शॉवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
Web Title: Sister in law shared photos of ishant sharmas wife pratibha singhs baby shower event vbm