• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs pak match narendra modi stadium 11000 security force deployed with bomb squad jshd import rmm

भारत-पाक सामन्यापूर्वी स्टेडियमचं अभेद्य किल्ल्यात रुपांतर, बॉम्ब निकामी पथकासह ११ हजार सुरक्षा कर्मचारी तैनात

भारत-पाकिस्तान सामन्याच्या पार्श्वभूमीवर नरेंद्र मोदी स्टेडियमवर कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

October 12, 2023 19:56 IST
Follow Us
  • ind vs pak
    1/9

    World Cup 2023: भारत आणि पाकिस्तान (IND Vs PAK) पुन्हा एकदा ICC विश्वचषकात आमनेसामने येणार आहेत.

  • 2/9

    अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर १४ ऑक्टोबरला दोन्ही संघ भिडतील. हा सामना विश्वचषकातील सर्वात महत्त्वाच्या सामन्यांपैकी एक आहे.

  • 3/9

    भारत आणि पाकिस्तान सामन्यापूर्वी अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमचं रुपांतर अभेद्य किल्ल्यामध्ये केलं आहे.

  • 4/9

    भारत-पाकिस्तान स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर स्टेडियम परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी संपूर्ण अहमदाबाद शहरात विविध दलाचे ११ हजारांहून अधिक कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत.

  • 5/9

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुरक्षेत काउंटर-टेरर फोर्स, नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), रॅपिड अॅक्शन फोर्स (RAF), होमगार्ड आणि गुजरात पोलिसांचा समावेश आहे.

  • 6/9

    याशिवाय सुरक्षा जवानांसह बॉम्ब निकामी पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

  • 7/9

    सामन्यादरम्यान बॉम्ब निकामी पथकाशिवाय एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या तुकड्याही तैनात असतील.

  • 8/9

    भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान नरेंद्र मोदी स्टेडियम बॉम्बने उडवून देण्याची धमकी अहमदाबाद पोलिसांना ई-मेलद्वारे मिळाली होती.

  • 9/9

    भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याची संपूर्ण जग वाट पाहत आहे. अशा परिस्थितीत विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेत दोन्ही संघ आमनेसामने येणार असल्याने क्रिकेटप्रेमींची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. (सर्व छायाचित्रे: पीटीआय)

TOPICS
क्रिकेटCricketक्रिकेट विश्वचषक २०२३Cricket World Cupभारत विरुद्ध पाकिस्तानInd vs Pak

Web Title: Ind vs pak match narendra modi stadium 11000 security force deployed with bomb squad jshd import rmm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.