-
टीम इंडियाचा युवा फलंदाज यशस्वी जैस्वाल हळूहळू मोठ्या उंचीकडे वाटचाल करत आहे आणि आपली प्रतिभा दाखवत आहे. गेल्या काही काळापासून यशस्वी आपल्या झंझावाती फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर तो भारतीय टी-२० संघात आपले स्थान पक्के करण्याचा सतत प्रयत्न करत असतो.
-
मात्र, यशस्वीसाठी इथपर्यंत पोहोचणे अजिबात सोपे नव्हते. उत्तर प्रदेशातील भदोही येथे राहणारा यशस्वी वयाच्या १२व्या वर्षी क्रिकेटर बनण्याचे स्वप्न घेऊन मुंबईत आला.
-
एका सामान्य कुटुंबातून आलेल्या यशस्वीने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केला. क्रिकेटर होण्यासाठी भदोहीहून मुंबईत आल्यावर तो पाणीपुरी विकून आपला उदरनिर्वाह करत असे.
-
त्याच्याकडे राहण्यासाठी स्वतःचे घरही नव्हते, त्यामुळे त्याला अनेक रात्री झोपडीत राहून काढाव्या लागल्या. पण आता यशस्वीचे दिवस बदलले आहेत. आता क्रिकेटर आपल्या कुटुंबासोबत मुंबईत ५ बीएचके आलिशान फ्लॅटमध्ये राहतो.
-
यशस्वीने अंडर-१९ विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी केली होती, ज्यामुळे त्याला टूर्नामेंटचा सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवडण्यात आले. यानंतर त्याला राजस्थान रॉयल्सने २०२० मध्ये २ कोटी ४० लाख रुपयांना विकत घेतले.
-
इंडियन प्रीमियर लीग (IPL) ही जगातील सर्वात महागडी क्रिकेट लीग आहे आणि २१ वर्षीय यशस्वीला IPL खेळत केवळ ४ वर्षे झाली आहेत. इतक्या कमी वयात त्याने करोडोंची संपत्ती कमावली आहे.
-
यशस्वी जैस्वाल आपल्या मेहनतीने आज करोडोंचा मालक झाला आहे. त्याच्याकडे आलिशान कार आणि आलिशान घर आहे. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर त्याची एकूण संपत्ती १६ कोटी रुपये आहे.
(फोटो स्त्रोत: @yashasvijaiswal28/instagram)
एकेकाळी झोपडीत रात्र घालवणाऱ्या यशस्वी जैस्वालची संपत्ती किती माहितीये? मुंबईत घेतला ५ बीएचके फ्लॅट, अन्…
Yashasvi Jaiswal Net Worth : एका सामान्य कुटुंबातून आलेल्या यशस्वीने आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी खूप संघर्ष केला. आज तो आयपीएलमध्ये करोडोंची कमाई करतो आणि मुंबईत एका आलिशान फ्लॅटमध्ये राहतो.
Web Title: Yashasvi jaiswal once used to spend night living in tent now he owns luxurious 5 bhk flat see phhotos jshd import pdb