Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl season 17 schedule announced these upcoming matches will be most exciting arg

IPLच्या 17 व्या पर्वाचे वेळापत्रक जाहीर, ‘CSK vs RCB’ सह ‘हे’ सामने ठरणार सर्वाधिक रोमांचक!

आयपीएलच्या सामन्यांचा वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घेऊया २१ सामन्यांच्या पहिल्या सेटमधील होणाऱ्या काही रोमांचक सामन्यांबद्दल.

Updated: February 24, 2024 10:36 IST
Follow Us
  • IPL-Season-17-Schedule-and-upcoming-matches
    1/12

    मार्च महिन्यात सुरू होणारी इंडियन प्रीमियर लीगचे सर्वच क्रिकेटप्रेमी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. आयपीएल भारतात खूप चर्चेत असते. संपूर्ण जगातील चाहत्यांचे या खेळांकडे लक्ष असते. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 2/12

    आयपीएलच्या सामन्यांचा वेळापत्रक जाहीर झाले आहे. जाणून घेऊया २१ सामन्यांच्या पहिल्या सेटमधील होणाऱ्या काही रोमांचक सामन्यांबद्दल. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 3/12

    आयपीएल २०२४ चा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये होणार आहे. २२ मार्च रोजी रात्री ८ वाजता हा सामना सुरू होईल. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 4/12

    एमएस धोनीच्या सीएसके विरुद्ध विराट कोहलीच्या आरसीबीमध्ये हा सामना रंगणार आहे. वैयक्तिक कारणांमुळे भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिका खेळू न शकणाऱ्या विराट कोहलीला या सामन्यातून पुनरागमन करताना आपल्याला पाहता येणार आहे. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 5/12

    पाच वेळा आयपीएलचे जेतेपद पटकावून देणारा, तसेच चेन्नईला पाच वेळा अंतिम फेरीत पोहोचवणारा धोनी यंदाच्या पर्वात संघाचे नेतृत्व करणार का हे रहस्य २२ मार्चलाच उघड होणार आहे. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 6/12

    २३ मार्चला कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद हा सामना खेळवला जाईल. आयपीएलच्या इतिहासातील सर्वात म्हगडे खेळाडू म्हणजेच मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स हे कोलकाता आणि हैदराबाद संघातून खेळणार आहेत. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 7/12

    २४ मार्चला गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हा सामना असेल. या सामन्याचे वैशिष्ट्य म्हणजे २०२२ साली गुजरातला आयपीएलचे विजेतेपद पटकावून देणारा हार्दिक पंड्या २०२४ च्या आयपीएलमध्ये आपल्या जुन्या संघामध्ये परतला आहे. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 8/12

    कर्णधार म्हणून हार्दिक मुंबईच मार्गदर्शन कसे करतो हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक असणार आहेत. या सामन्यामध्ये गुजारतचे कर्णधारपद प्रथमच शुभमन गिल सांभाळणार आहे. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 9/12

    ७ एप्रिलला दुपारी ३.३० वाजता मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स ही लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन संघांमध्ये एकूण ३३ सामने खेळवण्यात आले. त्यातील दिल्लीणे १५ तर मुंबईने १८ सामने जिंकले आहेत. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 10/12

    रोहित शर्मा, ईशान किशन विरुद्ध अक्षर पटेल, मुकेश कुमार या अनुभवी खेळाडूंमध्ये रंगणारा हा सामना प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात अजिबात कमी पडणार नाही. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 11/12

    ७ एप्रिलला सायंकाळी ७.३० वाजता लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळवला जाईल. आजवर झालेल्या चार सामन्यांमध्ये गुजरातने लखनऊचा पराभव केला आहे. यंदा लखनऊ गुजरातवर मात करणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

  • 12/12

    (फोटो : अधिकृत आयपीएल पेज)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Ipl season 17 schedule announced these upcoming matches will be most exciting arg 02

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.