• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. from mohammad shami to dhruv jurel who represents the indian cricket team know who are the cricketers of up vbm

PHOTOS : फक्त राजकारणातच नव्हे तर शमी ते ध्रुव जुरेलपर्यंत यूपीची ‘ही’ मुलं क्रिकेटच्या खेळपट्टीवरही आहेत सुपरहिट

UP Cricketers in Team India : दिल्लीच्या तख्ताचा रस्ता लखनौमधून जातो, अशी एक म्हण भारतीय राजकारणात प्रसिद्ध आहे. उत्तर प्रदेशने देशाला अनेक पंतप्रधान दिले आहेत. त्याचबरोबर भारतीय संघातील यूपी क्रिकेटपटूंची संख्या वाढत आहेत.

Updated: March 3, 2024 19:00 IST
Follow Us
  • UP cricketers in Indian team,
    1/11

    अमरोहा येथील रहिवासी असलेला अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी भारताचा प्रमुख गोलंदाज आहे. तो जगातील सर्वोत्तम फलंदाजांना आपल्या वेगाने चकमा देण्यात माहीर आहे. (Photo Source -Mohammed Shami Insta)

  • 2/11

    त्याने भारतासाठी ६४ कसोटी, १०१ वनडे आणि २३ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये अनुक्रमे ३६४, १९५ आणि २४ विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकाच्या इतिहासात सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तो पाचव्या स्थानावर आहे. (Photo Source -Mohammed Shami Insta)

  • 3/11

    यशस्वी जैस्वाल हा भदोहीचा रहिवासी असून भारतीय संघाचा युवा सलामीवीर आहे. त्याने भारतीय संघासाठी आतापर्यंत ८ कसोटी आणि १७ टी-२० सामने खेळले आहेत. (Photo Source -Yashasvi Jaiswal Insta)

  • 4/11

    ज्यामध्ये अनुक्रमे ९७१ आणि ५०२ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन द्विशतक आणि तीन शतकांचा समावेश आहे. (Photo Source -Yashasvi Jaiswal Insta)

  • 5/11

    कुलदीप यादवही यूपीचा रहिवासी आहे. भारतीय संघातील महत्त्वाचा सदस्य कुलदीप यादव सध्या तिन्ही फॉरमॅटमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. (Photo Source -Kuldeep Yadav Insta)

  • 6/11

    कुलदीपने भारतासाठी आतापर्यंत ११ कसोटी, १०३ वनडे आणि ३५ टी-२० सामने खेळले आहेत. कुलदीपच्या नावावर कसोटीत ४६, वनडेत १६८ आणि टी-२०मध्ये ५९ विकेट्स आहेत. (Photo Source -Kuldeep Yadav Insta)

  • 7/11

    आग्रा येथील रहिवासी असलेल्या ध्रव जुरेलने कारकिर्दीतील पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अशी कामगिरी केली आहे. यावरून तो लांब शर्यतीचा घोडा असल्याचे सिद्ध होते. (Photo Source -Dhruv Jurel Insta)

  • 8/11

    इंग्लंडविरुद्ध कसोटी पदार्पण करणाऱ्या ध्रुव जुरेलने अवघ्या दोन सामन्यांत आपली छाप पाडली आहे. रांची येथे खेळल्या गेलेल्या चौथ्या कसोटीत त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. (Photo Source -Dhruv Jurel Insta)

  • 9/11

    टीम इंडियाची युवा स्टार रिंकू सिंगला कोण ओळखत नाही? आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्ससाठी चमत्कार करणाऱ्या रिंकूने टीम इंडियासाठीही शानदार फलंदाजी केली आहे. (Photo Source -Rinku Singh Insta)

  • 10/11

    रिंकूने दोन वनडे आणि १५ टी-२० सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्याने अनुक्रमे ५५ आणि ३५६ धावा केल्या आहेत. (Photo Source -Rinku Singh Insta)

  • 11/11

    वेगवान गोलंदाज शिवम मावी नोएडा येथील रहिवासी असून त्यालासहा टी-२० सामने खेळण्याची संधी मिळाली आहे. त्याने भारताकडून टी-२० मध्ये सात विकेट घेतल्या आहेत. (Photo Source -Shivam Mavi Insta)

TOPICS
इंडियन क्रिकेटIndian Cricketकुलदीप यादवKuldeep Yadavमोहम्मद शमीMohammad Shamiयशस्वी जैस्वाल

Web Title: From mohammad shami to dhruv jurel who represents the indian cricket team know who are the cricketers of up vbm

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.