-
आयपीएल २०२४ मध्ये मुंबई इंडियन्स संघाने दिल्ली कॅपिटल्सचा २९ धावांनी पराभव करत यंदाच्या मोसमातील पहिला विजय नोंदवला आहे. (Photo Source – IPL X)
-
दिल्लीविरूद्धच्या या विजयासह १५० टी-२० सामने जिंकणारा मुंबई इंडियन्स हा पहिला संघ ठरला आहे. (Photo Source – IPL X)
-
दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध केलेल्या २३४ धावा ही मुंबई इंडियन्सची आयपीएलच्या इतिहासातील तिसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. (Photo Source – IPL X)
-
या हंगामाच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्ध २३६ धावा केल्या होत्या. जी त्यांची आयपीएलमधील सर्वात मोठी धावसंख्या आहे. (Photo Source – IPL X)
-
याशिवाय मुंबई इंडियन्स संघाने २४व्यांदा आयपीएलमध्ये २०० हून अधिक धावा केल्या आहेत. (Photo Source – IPL X)
-
टी-२० क्रिकेटच्या इतिहासात मुंबई इंडियन्स हा पहिलाच संघ बनला आहे. ज्याने २३० पेक्षा जास्त मोठी धावसंख्या उभारली पण तरीही कोणत्याही फलंदाजाने अर्धशतकही केले नाही. (Photo Source – MI X)
-
यापूर्वी सॉमरसेट संघाने केंटविरुद्ध २२६ धावा केल्या होत्या. त्यानंतरही सॉमरसेटच्या एकाही फलंदाजाने अर्धशतक झळकावले नव्हते. (Photo Source – MI X)
PHOTOS : मुंबई इंडियन्सने IPL 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध पहिलावहिला विजय मिळवत लावली विक्रमांची रांग
MI vs DC Match : मुंबई इंडियन्स संघाने आयपीएल २०२४ मध्ये विजयाचे खाते उघडले. दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध झालेल्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने २९ धावांनी सामना जिंकला. या विजयाबरोबर मुंबई संघाने अनेक विक्रमही रचले.
Web Title: In ipl 2024 mumbai indians created a series of records by defeating delhi capitals vbm