-
या हंगामात आतापर्यंत सनरायझर्स हैदराबादचा फलंदाज हेनरिच क्लासेनने सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. क्लासेनने ६ सामन्यात २४ षटकार मारले आहेत.
-
त्याचबरोबर राजस्थान रॉयल्सचा रियान पराग या यादीत दुसऱ्या स्थानावर आहे. रियान परागने ७ सामन्यात २० षटकार ठोकले आहेत. रियान परागने या मोसमात ३१८ धावा केल्या आहेत.
-
केकेआरच्या सुनील नरेनने ६ सामन्यात २० षटकार ठोकले आहेत. त्याचबरोबर सुनीलने या मोसमात आतापर्यंत २७६ धावा केल्या असून ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट-रियाननंतर तिसऱ्या क्रमांकावर आहे.
-
लखनऊ सुपर जायंट्सचा फलंदाज निरोलस पूरन सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत चौथ्या स्थानावर आहे. निकोलस पुरनने आतापर्यंत ६ सामन्यात १९ षटकार मारले आहेत.
-
या यादीत मुंबई इंडियन्सचा रोहित शर्मा पाचव्या स्थानावर आहे. रोहित शर्माने ७ सामन्यात १८ षटकार ठोकले आहेत. याशिवाय रोहित शर्माच्या बॅटमधून २९७ धावा आल्या आहेत. (Photo Source – IPL X)
PHOTOS : IPL 2024 मध्ये ‘या’ खेळाडूंनी फोडला आहे गोलंदाजांना घाम, कोण आहेत सर्वाधिक षटकार मारणारे टॉप-५ फलंदाज?
Most Sixes in IPL 2024 :आयपीएल २०२४ मध्ये संघ सातत्याने मोठी धावसंख्या उभारत आहेत. पण या हंगामात आतापर्यंत सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोणाचा समावेश आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया.
Web Title: Most sixes in ipl 2024 heinrich klaasen riyan parag sunil narine nicholas pooran and rohit sharma vbm