• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. t20 world cup what are 2007 t20 wc winner players are doing nowadays four of them are still playing cricket rohit sharma ms dhoni bdg

T20 World Cup: भारताने जिंकलेल्या पहिल्या वहिल्या टी-२० वर्ल्डकपमधील खेळाडू आता करतात तरी काय? चार खेळाडू अजूनही आहेत सक्रिय

T20 World Cup: टी-२० विश्वचषक २०२४ साठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखालील टीम इंडिया येत्या २ जूनपासून अमेरिका-वेस्ट इंडिजमध्ये खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकपसाठी सज्ज झाले आहेत. तत्त्पूर्वी पहिल्या विश्वचषकातील खेळाडू सध्या काय करतात याचा आढावा घेऊया.

May 3, 2024 19:42 IST
Follow Us

    T20 World Cup 2007 Players
    युवराज सिंग
    २००७ च्या वर्ल्डकप संघाचा उपकर्णधार असलेला युवराज सिंग सध्या कॉमेंटेटर आहे. तर यंदाच्या टी-२० विश्वचषकासाठी आयसीसीने त्याची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून नेमणूक केली आहे. एका षटकात ६ षटकार मारण्याचा विक्रम युवराजने याच विश्वचषकात केला होता.
    वीरेंद्र सेहवाग
    भारताचा माजी विस्फोटक फलंदाजही सध्या कॉमेंट्री करताना दिसतो, तर त्याच्या सोशल मीडिया एक्सवरील पोस्ट आणि त्याची वक्तव्य लक्ष वेधून घेणारी असतात.
    अजित आगरकर
    अजित आगरकर सध्या बीसीसीआयच्या निवड समितीचे अध्यक्ष आहेत. यंदाच्या टी-२० वर्ल्डकप संघाची निवड सर्वांच्या मदतीसह त्यांनीच केली आहे.
    गौतम गंभीर
    गौतम गंभीर सध्या कॉमेंटेटर आणि आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहे. गंभीर पूर्वी लखनऊ संघाचा मेंटॉर होता तर आयपीएल २०२४ मध्ये तो आपला जुना संघ केकेआरकडे परतला आहे.
    हरभजन सिंग
    भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू असलेला हरभजन सिंगही सध्या कॉमेंट्री विश्वात आहे.
    जोगिंदर शर्मा
    भारताचा हा वर्ल्डकप हिरो हरियाणा येथे डीएसपी पोलीस उपअधिक्षक म्हणून कार्यतर आहे.
    इरफान पठाण
    इरफान पठाण हा सध्या कॉमेंटेटर आहे. आयपीएल २०२४ मध्ये तो कॉमेंटेटर आणि क्रिकेट तज्ञ म्हणून सर्वच सामन्यांसाठी दिसतो.
    युसुफ पठाण
    इरफान पठाणचा मोठा भाऊ असलेला युसुफ पठाणही कॉमेंट्री करताना दिसतो. पण यंदा युसुफ पठाण राजकारणाच्या पिचवर उतरला असून तो त्रिणमूल काँग्रेस पक्षाकडून बहरामपूर येथून लोकसभेची निवडणूक लढवणार आहे.
    आर पी सिंग
    भारताचा वेगवान गोलंदाज असलेला आर पी सिंग म्हणजेच रूद्र प्रताप सिंग या सध्या कॉमेंट्रीच्या जगतात आहे.
    एस श्रीशांत
    आपल्या क्रिकेट कारकि‍र्दीत चर्चेचा विषय ठरलेला एस श्रीशांत हा सध्या कॉमेंट्री करताना दिसतो. स्पॉट फिक्सिंग प्रकरणाखाली अटक झाल्यानंतर बीसीसीआयने त्याच्यावर क्रिकेट खेळण्यावर बंदी घातली होती.
    रॉबिन उथप्पा
    आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेला रॉबिन उथप्पाही सध्या कॉमेंट्रीच्या विश्वात आहे. आयपीएल सामन्यांमध्ये उथप्पा कॉमेंट्री करताना दिसत आहे.
    एमएस धोनी
    २००७ च्या वर्ल्डकप संघाचा कर्णधार असलेला धोनी अजूनही क्रिकेट स्पर्धा खेळताना दिसतो. धोनी अजूनही आयपीएल २०२४ मध्ये खेळत आहे. २०२३ पर्यंत तो चेन्नई सुपर किंग्स संघाचा कर्णधार होता.
    दिनेश कार्तिक
    दिनेश कार्तिकही अजूनही आयपीएलमध्ये खेळताना दिसत आहे. आयपीएल २०२४ मध्ये आरसीबीकडून खेळणारा कार्तिक यंदा तुफान फॉर्मात आहे. याचसोबत भारताच्या सामन्यांमध्ये तो कॉमेंट्रीही करतो.
    पियुष चावला
    भारताचा उत्कृष्ट फिरकीपटू असलेला पियुष चावला अजूनही आयपीएलमध्ये कार्यरत आहे. २०२३ च्या आयपीएलमध्ये त्याने मुंबई इंडियन्सकडून पुन्हा आयपीएलमध्ये पुनरागमन केले.
    रोहित शर्मा
    २००७ च्या वर्ल्डकपमधील सर्वात तरूण खेळाडू असलेला रोहित शर्मा यंदाच्या २०२४ च्या टी-२० वर्ल्डकप संघाचा कर्णधार आहे. रोहित सध्या भारताच्या तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार असून तो आयपीएलमध्येही सक्रिय आहे.
TOPICS
आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ICC T20 World Cup 2024मराठी बातम्याMarathi Newsमहेंद्रसिंग धोनीMahendra Singh Dhoniयुवराज सिंगYuvraj Singhरोहित शर्माRohit Sharma

Web Title: T20 world cup what are 2007 t20 wc winner players are doing nowadays four of them are still playing cricket rohit sharma ms dhoni bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.