-
युजवेंद्र चहल आता टी-२० क्रिकेटच्या इतिहासात ३५० विकेट्स पूर्ण करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. टी-२० क्रिकेटमध्ये ३५० विकेट्स घेणारा तो इतिहासातील केवळ पाचवा फिरकी गोलंदाज ठरला आहे. चहलने ३०१ सामने खेळताना इतक्या विकेट घेतल्या आहेत. (Photo Source -IPL X)
-
युजीने आयपीएल २०२४ मध्ये दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात १ विकेट घेत हा पराक्रम केला आहे. चहलने त्याच्या टी-२० कारकिर्दीत मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि हरियाणाकडून देशांतर्गत क्रिकेटमध्येही खेळला आहे. (Photo Source -IPL X)
-
युजवेंद्र चहलनंतर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज पियुष चावला आहे. चावलाच्या नावावर सध्या २९३ टी-२० सामन्यांमध्ये ३०१ विकेट्स आहेत. (Photo Source -IPL X)
-
शाकिब अल हसन टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा चौथा गोलंदाज आहे. शाकिबने आपल्या टी-२० कारकिर्दीत आतापर्यंत ४२८ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर ४८२ विकेट्स आहेत. (Photo Source – Shakib Al Hasan X)
-
या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पाकिस्तानी वंशाचा इम्रान ताहिर आहे, जो दक्षिण आफ्रिकेकडून खेळला आहे. जगभरात टी-२० क्रिकेट खेळताना, ताहिरने ४०५ सामन्यात ५०२ विकेट्स घेतल्या आहेत. (Photo Source -Imran Tahir X)
-
सुनील नरेन हा टी-२० फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा दुसरा फिरकी गोलंदाज आहे. नरेनने या फॉरमॅटमध्ये १४ संघांचे प्रतिनिधित्व करत ५०९ सामन्यांमध्ये ५४९ विकेट्स घेतल्या आहेत. लवकरच टी-२० क्रिकेटमध्ये ५५० विकेट्स पूर्ण करणारा तो तिसरा गोलंदाज ठरणार आहे. (Photo Source -KKR X)
-
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारा फिरकी गोलंदाज राशिद खान आहे. त्याने आतापर्यंत ४२४ सामन्यात ५७२ विकेट घेतल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत राशिद फक्त ड्वेन ब्राव्हो (६२५) च्या मागे आहे. (Photo Source -Rashid Khan X)
‘एक नंबर तुझी कंबर…’, गाण्यावर चिमुकलीचा जबरदस्त डान्स; VIDEO पाहून नेटकरीही करतायत कौतुक