• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • वाचक सर्वेक्षण
  • New Quiz
  • लोकसत्ता प्रीमियम
  • संसदीय अधिवेशन
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2024 these are the indian captains who led their teams to the playoffs in their debut attempt rohit sharma ms dhoni bdg

Photos: पदार्पणाच्या IPL हंगामात ‘या’ भारतीय कर्णधारांनी आपल्या संघाला नेलंय प्लेऑफमध्ये

IPL 2024 Playoffs: आयपीएल २०२४ आता अखेरच्या टप्प्यावर पोहोचली आहे. प्लेऑफमधील दोन संघ आयपीएल २०२४ च्या प्लेऑफसाठी पात्र झाले आहेत. यादरम्यानच आपण आज असे भारतीय खेळाडू पाहणार आहोत, ज्यांनी कर्णधार म्हणून पदार्पणाच्या पहिल्याच हंगामात संघाला प्लेऑफपर्यंत नेले होते.

May 15, 2024 13:41 IST
Follow Us
  • Indian captains who led their teams to the playoffs in their debut attempt
    1/11

    एसएस धोनी
    आयपीएल २००८ च्या पहिल्याच हंगामापासून चेन्नई सुपर किंग्सचे कर्णधारपद एम एस धोनीकडे होते. त्याने पहिल्याच हंगामात त्याच्या नेतृत्त्वाखालील संघाला प्लेऑफमध्ये नेले होते.

  • 2/11

    वीरेंद्र सेहवाग
    आयपीएल २००८ मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार असलेल्या सेहवाहगने संघाला पहिल्याच वर्षी प्लेऑफमध्ये नेले होते.

  • 3/11

    युवराज सिंग
    धोनी आणि सेहवागप्रमाणे पहिल्याच वर्षी कर्णधार युवराज सिंगच्या नेतृत्त्वाखालील पंजाब किंग्सचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला होता.

  • 4/11

    अनिल कुंबळे
    आयपीएल २००९ मध्ये अनिल कुंबळेच्या नेतृत्त्वाखालील आरसीबीचा संघाला प्लेऑफ गाठण्यात यश मिळाले होते.

  • 5/11

    हरभजन सिंग
    हरभजन सिंगने २०१२च्या आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघआचे नेतृत्त्व केले होते. त्याच्या कर्णधारपदाच्या पदार्पणातच त्याने मुंबईला प्लेऑफमध्ये नेले.

  • 6/11

    रोहित शर्मा
    मुंबई इंडियन्सचा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या रोहित शर्माने कर्णधार म्हणून पदार्पणाच्या पहिल्याच सामन्यात संघाला प्लेऑफ गाठून दिले आणि पहिले वहिले आयपीएलचे जेतेपदही मुंबईला मिळवून दिले.

  • 7/11

    सुरेश रैना
    २०१६ मध्ये सुरेश रैनाने गुजरात लायन्स संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि कर्णधार म्हणून पहिल्याच हंगामात त्याने लायन्सला प्लेऑफमध्ये नेले.

  • 8/11

    अजिंक्य रहाणे
    २०१८ मध्ये राजस्थान रॉयल्सच्या नेतृत्त्वाची जबाबदारी नवा कर्णधार अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर होती, ज्याने संघाला प्लेऑफपर्यंत नेले.

  • 9/11

    दिनेश कार्तिक
    २०१८ मध्ये दिनेश कार्तिकने केकेआर संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि कर्णधारपद म्हणून पदार्पणाच्या सामन्यात केकेआरला प्लेऑफमध्ये नेले.

  • 10/11

    श्रेयस अय्यर
    २०१९ मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्त्व श्रेयस अय्यरकडे होते. दिल्लीसाठी पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या श्रेयसने संघाला प्लेऑफचा रस्ता गाठून दिला होता.

  • 11/11

    ऋषभ पंत
    २०२१ मध्ये दिल्लीने ऋषभ पंतच्या खांद्यावर दिल्लीने कर्णधारपदाची जबाबदारी दिली, ज्याने पहिल्याच हंगामात दिल्लीला प्लेऑफ गाठून दिले होते.

  • 12/11

    हार्दिक पंड्या
    २०२२ मध्ये गुजरात टायटन्स संघाने पंड्याला आपल्या संघाचा कर्णधार बनवले आणि पहिल्याच वर्षात त्याने गुजरातला प्लेऑफसह ट्रॉफीही जिंकून दिली.

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025क्रिकेट न्यूजCricket Newsमराठी बातम्याMarathi Newsमुंबई इंडियन्स (Mumbai Indians)Mumbai Indiansरोहित शर्माRohit Sharmaहार्दिक पांड्याHardik Pandya

Web Title: Ipl 2024 these are the indian captains who led their teams to the playoffs in their debut attempt rohit sharma ms dhoni bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.