-
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या जोर धरत आहेत.
-
सध्या ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर सर्वत्र हार्दिक आणि नताशाच्या घटस्फोटाची चर्चा होत आहे. त्याचबरोबर नताशाला ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे.
-
दरम्यान, हार्दिक पांड्याच्या जुन्या नात्याबद्दलही अनेकजण बोलत आहेत. आज आपण जाणून घेऊया हार्दिकने नताशासोबत लग्नापूर्वी कोणाकोणाला डेट केले आहे.
-
या यादीतील पहिले नाव आहे कोलकाता मॉडेल लीशा शर्माचे. दोघेही एकमेकांना बराच काळ डेट करत होते.
-
२०१७ साली लीशा आणि हार्दिक वेगळे झाले. रिपोर्टनुसार, हार्दिकला त्याच्या करिअरवर लक्ष केंद्रित करायचे होते, यामुळे हे नाते तुटले.
-
यानंतर, हार्दिक ‘बिग बॉस ७’ फेम एली अवरामला डेट करत असल्याच्या अफवा पसरल्या होत्या. २०१७ मध्ये हार्दिकचा भाऊ कुणाल पांड्याच्या लग्नातही एलीने हजेरी लावली होती. त्यांचे नातेही फार काळ टिकले नाही आणि त्यांचे एलीसोबत ब्रेकअपही झाले.
-
एलीनंतर हार्दिक बॉलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ताला डेट करत असल्याच्या बातम्या आल्या होत्या, पण दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितले नाही. ईशा गुप्ता आणि हार्दिक पांड्या एका पार्टीदरम्यान भेटले होते.
-
हार्दिकचे नाव उर्वशी रौतेलासोबतही जोडले गेले होते. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.
-
हार्दिक आणि उर्वशी यांनी नेहमी म्हटलं की ते फक्त चांगले मित्र आहेत. मात्र, अशा अफवा होत्या की त्यांचे नाते खूप खोल होते.
ईशा गुप्ता ते उर्वशी रौतेला, नताशाच्या आधी हार्दिक पंड्याने ‘या’ अभिनेत्रींना केलंय डेट; पाहा संपूर्ण यादी
हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविच गेल्या सहा महिन्यांपासून त्यांच्या वैवाहिक जीवनामुळे चर्चेत आहेत. त्यांच्या घटस्फोटाच्या बातम्या सध्या जोर धरत आहेत.
Web Title: From esha gupta to urvashi rautela hardik pandya has dated these actresses before natasha stankovic see the full list pvp