• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • डोनाल्ड ट्रम्प
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vinod kambli serious health issues video viral income will shocked you monthly salary is only rs 30 thousand spl

एकेकाळी कोट्यधीश असलेल्या विनोद कांबळींची आताची कमाई पाहून विश्वासच बसणार नाही, फक्त ‘इतकं’ आहे उत्पन्न!

Former Indian Cricketer Vinod Kambli Health Issues: भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांची प्रकृती खूपच बिघडलेली दिसत आहे.

August 6, 2024 18:47 IST
Follow Us
  • Vinod Kambli
    1/9

    भारतीय क्रिकेट संघाचे माजी फलंदाज विनोद कांबळी सध्या प्रकृतीमुळे चर्चेत आले आहेत. त्यांचा एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये त्यांची प्रकृती खूपच बिघडलेली दिसत आहे. विनोद कांबळी यांना नीट चालताही येत नाही. एकेकाळी करोडोंची मालमत्ता असलेल्या विनोद कांबळी यांना आजघडीला पैशांची नितांत गरज भासत आहे.त्यांचे उत्पन्न जाणून तुम्हालाही आश्चर्य वाटेल. (Photo: Vinod Kambli /FB)

  • 2/9

    मीडिया रिपोर्ट्सनुसार, एकेकाळी करोडोंची कमाई करणाऱ्या कांबळी यांच्याकडे आता फक्त बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनचं उत्पन्न आहे.

  • 3/9

    मिड डेने २०२२ मध्ये एक रिपोर्ट प्रकाशित केला होता ज्यात विनोद कांबळी यांना बीसीसीआयकडून दरमहा ३० हजार रुपये पेन्शन मिळत असल्याचे सांगितले होते. यावरच त्यांना जगायचे आहे. मुंबईसारख्या शहरात एवढ्या पैशात महिनाभर जगणे अवघड आहे. मात्र, मुंबईत त्यांचे स्वतःचे घर आहे.

  • 4/9

    २०२२ पर्यंत विनोद कांबळी यांचे वार्षिक उत्पन्न केवळ ४ लाख रुपये होते. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर कांबळी कॉमेंट्री आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करत होते. २०२२ मधील एका अहवालानुसार, त्यांची एकूण संपत्ती तेव्हा दीड मिलियन डॉलर होती.

  • 5/9

    विनोद कांबळी यांनी अनर्थ आणि पल पल दिल के पास या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे. याशिवाय साऊथ चित्रपट आणि टीव्ही शोमध्येही काम केले आहे. असं असलं तरीही आज विनोद यांना पैशांची निकड भासत आहे.

  • 6/9

    कांबळी यांनी २०१९ साली संघाचे शेवटचे प्रशिक्षकपद भूषवले होते. त्यावेळी कांबळी T-२० मुंबई लीगशी जोडला गेले होते. त्यानंतर कोरोना महामारीमुळे कांबळी यांचे कमाईचे साधन खंडित झाले.

  • 7/9

    विनोद कांबळी यांनी भारतासाठी एकूण १०४ एकदिवसीय आणि १७ कसोटी सामने खेळले आहेत. विनोद कांबळी आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर बालपणीचे मित्र आहेत.

  • 8/9

    विनोद कांबळी हे अनेक दिवसांपासून आरोग्याच्या समस्येने त्रस्त आहेत. त्यांना अनेकदा रुग्णालयात दाखलही करण्यात आले आहे. २०१३ मध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि नंतर दोन ब्लॉक ऑर्टरी दुरुस्त करण्यासाठी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली.

  • 9/9

    हे देखील वाचा : आजोबा, वडील आणि भाऊ होते बॅडमिंटनपटू, २२ व्या वर्षी लक्ष्य सेन करोडपती, जाणून घ्या शैक्षणिक माहिती

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsमराठी बातम्याMarathi News

Web Title: Vinod kambli serious health issues video viral income will shocked you monthly salary is only rs 30 thousand spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.