-
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार गोलंदाज मोहम्मद सिराजने नुकतीच नवी कार खरेदी केली आहे. आपल्या नवीन कारचे काही फोटो शेअर करत चाहत्यांना त्याने ड्रीम कार खरेदी केल्याची माहिती दिली आहे.
-
मोहम्मद सिराजने काळ्या रंगाची आलिशान रेंज रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे. हे फोटो शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘तुमच्या स्वप्नांना मर्यादित ठेवू नका, कारण हिच स्वप्न तुम्हाला कठोर परिश्रम करण्याची प्रेरणा देतात.’
-
सिराजने आई आणि कुटुंबासोबतचा फोटो शेअर करत भावुक कॅप्शनही दिलं.
-
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मोहम्मद सिराजने ही टॉप मॉडेल कार खरेदी केली आहे, जी काही मोजक्याच क्रिकेटपटूंकडे आहे.
-
सिराजच्या या आलिशान कारची किंमत २.५० कोटी रुपये आहे. भारतात लँड रोव्हरच्या कार्सची किंमत ६७ लाख रुपयांपासून सुरू होते, तर तिची सर्वाधिक किंमत २.५० कोटी रुपये आहे.
-
हैदराबादच्या गरीब मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या मोहम्मद सिराजचे वडील मोहम्मद घौस हे ऑटो रिक्षाचालक होते. क्रिकेटर होण्यापूर्वी सिराजच्या कुटुंबाकडे स्वतःचे घरही नव्हते.
-
वयाच्या १६व्या वर्षी पहिल्यांदा टेनिस बॉलने गोलंदाजी सुरू केल्यानंतर सिराजने वयाच्या १९व्या वर्षी क्लब क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली. क्रिकेट खेळणे त्याच्यासाठी सोपे नव्हते, पण आपल्या मुलाने क्रिकेटर व्हावे, असे त्याच्या वडिलांचे स्वप्न होते. जे सिराजने आपल्या मेहनतीने पूर्ण केले.
(फोटो स्त्रोत: @mohammedsirajofficial/instagram)
Photos: वडील चालवायचे रिक्षा अन् आता क्रिकेटपटू लेकाने कुटुंबाला गिफ्ट दिली आलिशान कार, किंमत तब्बल ‘इतके’ कोटी
Mohammed Siraj New Car: भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने आपल्या कुटुंबासाठी नवीन काळ्या रंगाची लक्झरी लँड रोव्हर एसयूव्ही खरेदी केली आहे, ज्याची किंमत कोटींमध्ये आहे.
Web Title: Mohammed siraj buys dream car range rover suv for his family in hyderabad shared post on instagram bdg