Powered by
  • English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • गणेश उत्सव २०२५
  • लोकसत्ता प्रीमियम
  • मनोज जरांगे पाटील
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. vinesh phogat returns to inida after heartbreak at paris olympics spl

Vinesh Phogat : दिल्ली विमानतळावरील जल्लोषपूर्ण स्वागत पाहून विनेश झाली भावूक तर भाऊ हरविंदर फोगट म्हणाला…

पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये विनेश फोगट जास्त वजनामुळे अपात्र ठरली होती, यामुळे तिच्या आणि संपूर्ण देशवासीयांच्या पदरी निराशा पडली होती. दरम्यान विनेश आज दिल्ली विमानतळावर परतली तेव्हा तिचे जोरदार स्वागत करण्यात आले.

Updated: August 17, 2024 14:47 IST
Follow Us
  • Vinesh Phogat returns Express photos
    1/9

    कुस्तीपटू विनेश फोगटचे आज दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर जोरदार स्वागत करण्यात आले. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 2/9

    यावेळी माध्यमांशी संवाद साधताना विनेश म्हणाली, “माझ्या लढ्यात माझ्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल मला देशातील लोकांचे आभार मानायचे आहेत, आमची लढाई अजून संपलेली नाही.” (Express Photo by Gajendra Yadav)

  • 3/9

    यावेळी खेळाडू बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि इतर अनेक कुस्तीपटूंनी विनेशचे स्वागत केले. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 4/9

    पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत महिलांच्या ५० किलो वजनी गटाच्या कुस्तीच्या सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी विनेश १०० ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरली होती. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 5/9

    सुवर्णपदकाच्या लढतीपूर्वी विनेशला अपात्र ठरवण्यात आले तेव्हा भारतीय ऑलिम्पिक संघटनेने त्यावर तीव्र आक्षेप नोंदवला होता. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 6/9

    या प्रकरणाबाबत, २९ वर्षीय कुस्तीपटू विनेशने सामायिक रौप्य पदक देण्यासाठी क्रीडा लवादाच्या न्यायालयाकडेही अपील केले होते, परंतु १४ ऑगस्ट रोजी संध्याकाळी तिची याचिका सीएएसने फेटाळली आहे. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 7/9

    पॅरिस ऑलिम्पिकमधून कोणतेही पदक न मिळवता विनेश फोगट जेव्हा भारतात परतली तरीही तिचे जोरदार स्वागत होत असल्याचे पाहून तिला अश्रू अनावर झाले आणि ती भावुक झाली. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 8/9

    “विनेश देशात परतली आहे. तिचे स्वागत करण्यासाठी लोक इथे (दिल्ली) विमानतळावर आले आहेत. आमच्या घरी आणि गावातही तिचे स्वागत करण्यासाठी लोक वाट पाहत आहेत. लोक विनेशला भेटून तिला प्रोत्साहन देण्यासाठी उत्सुक आहेत,” असे तिचा भाऊ हरविंदर फोगट यावेळी म्हणाला. (Express Photo by Gajendra Yadav)

  • 9/9

    हेही वाचा : Paris Olympic 2024 : भालाफेकमधील विश्वविक्रम काय आहे; Top 10 मध्ये भारताचा नीरज चोप्रा व पाकिस्तानचा अर्शद नदीम कितव्या स्थानी?

TOPICS
ऑलिम्पिक २०२४ (Olympic 2024)Olympic 2024कुस्तीWrestlingक्रीडाSportsबजरंग पुनियाBajrang Puniyaमराठी बातम्याMarathi Newsविनेश फोगटVinesh Phogat

Web Title: Vinesh phogat returns to inida after heartbreak at paris olympics spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.