-
क्रिकेटपटू रोहित शर्मा हा देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय आहे. त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. अशातच क्रिकेटबरोबरच रोहित त्याच्या वैयक्तिक आयुष्यात काय करतो हे जाणून घेण्यासाठीही चाहते उत्सुक असतात. (AP)
-
रोहित शर्मा हा भारताच्या कसोटी आणि एकदिवसीय संघाचा सध्याचा कर्णधार आहे. त्याने आपल्या कारकिर्दीत आक्रमक फलंदाजी करत १९ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. (AP Photo-Aijaz Rahi)
-
त्याची बॅट अनेकदा चर्चेत असते, ज्यावर ‘सीएट’ कंपनीचे स्टिकर अनेक वर्षांपासून दिसत आहे. रोहितला स्टिकर्स लावण्याचे पैसे मिळतात का? (AP)
-
रोहित शर्माला त्याच्या बॅटवर स्टिकर्स लावण्यासाठी किती पैसे मिळतात? हा करार किती वर्षांचा आणि किती कोटींचा आहे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया. (EXPRESS PHOTO – ABHINAV SAHA)
-
CEAT ही टायर उत्पादक कंपनी आहे. या कंपनीने २०१५ मध्ये रोहित शर्मासोबत पहिला करार केला होता. त्यानंतर रोहितच्या बॅटवर या कंपनीचा लोगो दिसत आहे. (AP/PTI)
-
वृत्तानुसार, ‘सीएटी’ कंपनी रोहित शर्माला बॅटवर स्टिकर्स लावण्यासाठी वार्षिक ४ कोटी रुपये देते. साधारणपणे, दोन्ही पक्षांमध्ये तीन वर्षांचा करार होतो आणि रोहितला एकूण १२ कोटी रुपये मिळत आहेत. (PTI Photo-Kamal Kishore)
-
विराट कोहलीच्या बॅटवर देखील ‘MRF’ या टायर बनवणाऱ्या कंपनीचा स्टिकर आहे. असे म्हटले जाते, विराटला एमआरएफकडून रोहित शर्मापेक्षा तिप्पट पैसे मिळतात. (Express Photo-Partha Paul)
-
रोहित शर्माने T20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, परंतु इतर सर्व फॉरमॅटमध्ये तो ‘CEAT’ स्टिकर असलेली बॅट घेऊन क्रिकेट खेळताना दिसत आहे. आयपीएलमध्येही तो याच बॅटने खेळतो. (AP Photo-Ramon Espinosa)
बॅटवर स्टीकर लावण्यासाठी रोहित शर्मा घेतो मोठी रक्कम! आकडा ऐकून व्हाल थक्क
रोहित शर्माला त्याच्या बॅटवर स्टिकर्स लावण्यासाठी किती पैसे मिळतात? हा करार किती वर्षांचा आहे? आज आपण या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया.
Web Title: Rohit sharma takes a huge amount to put a sticker on the bat you will be surprised to hear the figure pvp