• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 699
  • लोकसत्ता प्रीमियम
  • नवरात्रोत्सव
  • डोनाल्ड ट्रम्प
  • Sudoku
  • आजचा जोक
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ind vs aus border gavaskar trophy facts all you need to know india dominated australia spl

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचे नाव ‘बॉर्डर-गावस्कर करंडक’ असे का ठेवण्यात आले?, जाणून घ्या कधीपासून झाली सुरूवात, काय आहेत रेकॉर्ड?

१९९६ पासून भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी खेळली जात आहे. लिटल मास्टर सुनील गावस्कर आणि ॲलन बॉर्डर यांच्या नावावरुन या मालिकेचे नाव ठेवण्यात आले आहे.

September 11, 2024 12:22 IST
Follow Us
  • India vs Australia,IND vs AUS Test,Border Gavaskar Trophy
    1/9

    भारतीय क्रिकेट संघ यावर्षी नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे.

  • 2/9

    दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. ही मालिका बॉर्डर-गावस्कर करंडक म्हणून ओळखली जाते.

  • 3/9

    १९९१-९२ नंतर प्रथमच दोन्ही संघांमध्ये पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यानंतर यंदा प्रथमच दोन्ही संघ ५ सामन्यांची मालिका खेळणार आहेत.

  • 4/9

    त्याचे झाले असे की, १९४७-१९९६ या कालावधीत भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये ५० कसोटी सामने खेळले गेले. त्यानंतर १९९६ मध्ये या मालिकेचे नाव बदलून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ठेवण्यात आले. महान भारतीय क्रिकेटपटू सुनील गावस्कर आणि ऑस्ट्रेलियन माजी कर्णधार ॲलन बॉर्डर यांच्या उल्लेखनीय कामगिरीची नोंद घेत हे नाव देण्यात आले आहे.

  • 5/9

    भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात १९५६-५७ ते २०२२-२३ पर्यंत २८ कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत. यातील ऑस्ट्रेलियाने १२ तर भारताने ११ मालिका जिंकल्या आहेत. एकूण ५ मालिका अनिर्णित राहिल्या आहेत.

  • 6/9

    बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरू झाल्यापासून भारताने १० मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने पाच मालिका जिंकल्या आहेत. १९९६- ९७ ते २०२२-२३ पर्यंत फक्त एक कसोटी मालिका अनिर्णित राहिली आहे. २००३- ०४ मधील एक मालिका अनिर्णित राहिली होती.

  • 7/9

    भारताने मागील ५ बॉर्डर-गावस्कर मालिकापैकी ४ जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने २०१४- १५ पासून मालिका जिंकलेली नाही. भारताने सलग चार मालिका जिंकल्या आहेत. ऑस्ट्रेलियाच्या मागील दोन्ही दौऱ्यांमध्ये संघाने मालिका जिंकली आहे.

  • 8/9

    २००० सालानंतर भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आठ वेळा जिंकली आहे. तर ऑस्ट्रेलियाने चार वेळा बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी जिंकली आहे. एक मालिका अनिर्णित राहिली आहे.

  • 9/9

    हेही वाचा-

TOPICS
क्रिकेटCricketक्रीडाSportsमराठी बातम्याMarathi Newsसुनील गावसकरSunil Gavaskar

Web Title: Ind vs aus border gavaskar trophy facts all you need to know india dominated australia spl

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.