-
युझवेंद्र चहल हे भारतीय क्रिकेटमध्ये लेग स्पिन गोलंदाजीसाठी ओळखले जाणारे नाव आहे.
-
चहलने आपल्या चमकदार कामगिरीने क्रिकेट जगतात आपली खास ओळख निर्माण केली आहे.
-
पण क्रिकेटच्या मैदानावर धमाल उडवणारा युझवेंद्र चहल एकेकाळी उत्तम बुद्धिबळपटूही होता हे तुम्हाला माहीत आहे का?
-
एवढेच नाही तर क्रिकेटर होण्यासोबतच तो सरकारी नोकरीही करत आहे.
-
युजवेंद्र चहल हा पहिला भारतीय खेळाडू आहे ज्याने बुद्धिबळ आणि क्रिकेट या दोन्ही खेळांमध्ये देशाचे प्रतिनिधित्व केले आहे.
-
त्याने जागतिक युवा बुद्धिबळ स्पर्धेत भारताचे बुद्धिबळात प्रतिनिधित्व केले.
-
तथापि, त्याला बुद्धिबळामधे पुढे जाण्यासाठी प्रायोजकांच्या कमतरतेचा सामना करावा लागला, त्यामुळे त्याने क्रिकेटला आपले करिअर म्हणून स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
-
चहलने २००९ मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली आणि लवकरच आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने भारतीय संघात आपले स्थान निर्माण केले. T२०I क्रिकेटमध्ये सहा विकेट घेणारा तो पहिला भारतीय आणि दुसरा खेळाडू ठरला.
-
चहलची क्रिकेट कारकीर्द अगदी आयपीएलच्या मैदानातही चमकदार राहिली आहे. सुरुवातीला तो मुंबई इंडियन्सकडून खेळला, पण त्याचा खरा जलवा रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) आणि नंतर राजस्थान रॉयल्समध्ये पाहायला मिळाला.
-
सध्या, चहल राजस्थान रॉयल्स संघाचा एक भाग आहे आणि त्याने आपल्या लेग स्पिनने संघासाठी अनेक सामने जिंकले आहेत. युझवेंद्र चहलने क्रिकेटमध्ये यशाची शिखरे गाठतानाच सरकारी सेवेतही योगदान दिले. चहलची २०१८ मध्ये इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
-
(सर्व फोटो साभार- युझवेंद्र चहल इन्स्टाग्राम)
भारतीय संघातील ‘हा’ क्रिकेटर आयकर विभागात आहे इन्स्पेक्टर; बुद्धिबळपटूही होता, वाचा माहिती
Yuzvendra Chahal: क्रिकेटसोबतच युझवेंद्र चहलची कारकीर्द बुद्धिबळातही उत्कृष्ट राहिली आहे. तो भारतासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळला आहे.
Web Title: Cricketer yuzvendra chahal holding income tax inspector position since 2018 and was a chess player in his younger days spl