-
भारतीय क्रिकेट संघाचा माजी फलंदाज युवराज सिंग निवृत्तीनंतर बहुतांश वेळ कुटुंबासोबत घालवतो.
-
तो आपल्या मुला-मुलींसोबत मस्ती करतानाचे फोटोही सोशल मीडियावर शेअर करत असतो.
-
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर युवी माझी खेळाडूंच्या काही लीगमध्ये खेळतो.
-
मात्र, याशिवाय तो आपला सर्व वेळ कुटुंबाला देतो. क्रिकेटपटू निवृत्तीनंतर कॉमेंट्री किंवा कोचिंग सुरू करतात. पण युवीच्या बाबतीत असे नाही.
-
सोशल मीडियावर युवी त्याची पत्नी हेजल कीच तसेच त्याच्या मुलाचे आणि मुलीचे फोटो शेअर करत असतो.
-
युवराज सिंग हा दोन मुलांचा बाप आहे. त्याची पत्नी हेजल कीचने जानेवारी २०२२ मध्ये एका मुलाला आणि ऑगस्ट २०२३ मध्ये एका मुलीला जन्म दिला.
-
युवीच्या मुलाचे नाव ओरियन आहे तर मुलीचे नाव ऑरा आहे.
-
१२ नोव्हेंबर २०१५ रोजी युवराज सिंगने ब्रिटीश अभिनेत्री हेजल कीचशी एंगेजमेंट केली आणि ३० नोव्हेंबर २०१६ रोजी तिच्याशी लग्न केले. सलमान खानच्या बॉडीगार्ड चित्रपटात काम केलेली हेजल हॅरी पॉटर चित्रपटाच्या तिन्ही पार्टमध्ये दिसली आहे.
-
दरम्यान, युवराज सिंग आपल्या दोन्ही मुलांना लाडाने चंगु मंगू म्हणतो. हेजलने दिवाळीच्या दिवशी दोन्ही मुलांचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याच्या कमेंटमध्ये युवीने लिहिले- माझे चंगू मंगू. त्यापुढे त्याने हार्ट इमोजी देखील टाकला.
-
त्याच्या क्रिकेट कारकिर्दीतही मौजमजा करण्यात युवराज सिंगला कोणीही टक्कर देऊ शकलं नाही. आता युवी मुलांसोबत खूप मस्ती करतो. यासोबतच तो मुलांची पूर्ण काळजीही घेतो.
-
२०२३ मध्ये युवराज सिंगच्या मुलीचा जन्म झाला तेव्हा त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली होती. यामध्ये त्याने लिहिले होते की, आता तो निद्रानाशाचा आनंद घेत आहे. मुलांची काळजी घेण्यात तो पत्नी हेजलला पूर्ण सहकार्य करतो.
-
(सर्व फोटो साभार- युवराज सिंग इन्स्टाग्राम)
युवराज सिंगच्या गोंडस मुलांना पाहिलंत का? युवी लाडाने त्यांना काय हाक मारतो?
Yuvraj Singh : भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज युवराज सिंगने २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. निवृत्तीनंतर युवी माजी खेळाडूंच्या काही लीगमध्ये खेळतो.
Web Title: Former indian cricketer yuvraj singh son orion and daughter aura adorable photos goes viral spl