• English
  • தமிழ்
  • বাংলা
  • മലയാളം
  • ગુજરાતી
  • हिंदी
  • मराठी
  • Business
  • बिज़नेस

Loksatta

Newsletters
  • Whatsapp
  • Facebook
  • Youtube
  • Twitter
Google News Follow
सबस्क्राईब करा
  • होम
  • ईपेपर
  • महाराष्ट्र
  • शहर
  • देश-विदेश
  • क्रीडा
  • सत्ताकारण
  • विश्लेषण
  • हेल्थ
  • अर्थभान
  • करिअर
  • राशिभविष्य
  • मनोरंजन
  • ट्रेंडिंग
  • विचारमंच
  • चतुरा
  • फोटो
  • ट्रेंडिंग
  • Subscribe at Rs 499
  • पाऊस
  • स्वातंत्र्यदिन विशेष क्विझ
  • लोकसत्ता प्रीमियम
  • आजचा जोक
  • Sudoku
  • Stock Market

  1. Marathi News
  2. Photos
  3. sports gallery
  4. ipl 2025 mega auction top 10 most expensive players in indian premier league auction history mitchell starc pat cummins yuvraj singh bdg

Most Expensive Players in IPL: IPL इतिहासातील सर्वात १० महागडे खेळाडू आहेत तरी कोण? युवराज सिंगचा रेकॉर्ड अजूनही कायम

Top 10 Most Expensive Players in IPL History: आयपीएल २०२५ पूर्वी खेळाडूंचा महालिलाव होणार आहे. यापूर्वी कोणत्या खेळाडूंवर आयपीएलच्या इतिहासात मोठी बोली लागली आहे, जाणून घ्या.

Updated: November 13, 2024 12:22 IST
Follow Us
  • Who is the Most Expensive Player in IPL History
    1/10

    ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने २०२४ मध्ये आयपीएल लिलावात इतिहास घडवला. कोलकाता नाइट रायडर्सने त्याच्यावर मोठी बोली लावत २४.७५ कोटी रुपयांना संघात घेतले. अशारितीने स्टार्क आयपीएल लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.

  • 2/10

    सनरायझर्स हैदराबादने २०२४ लिलावात पॅट कमिन्सवर २०.५० कोटींची मोठी बोली लावली आणि संघात सामील केले. यासह कमिन्स इतिहासातील दुसरा सर्वात महागडा खेळाडू ठरला.

  • 3/10

    इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू सॅम करनसाठी पंजाब किंग्सने १८.५० कोटींची बोली लावली होती. सॅम करन आयपीएल २०२३ लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

  • 4/10

    मुंबई इंडियन्सने ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीनवर आयपीएल २०२३ मध्ये १७.५० कोटींची मोठी बोली लावली होती.

  • 5/10

    चेन्नई सुपर किंग्स संघाने आयपीएल २०२३ लिलावात इंग्लिश संघाचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्सवर १६.२५ कोटींची मोठी बोली लावली होती.

  • 6/10

    दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस मॉरिससाठी राजस्थान रॉयल्स संघाने २०२१ मध्ये १६.२५ कोटींची बोली लावली होती.

  • 7/10

    २०१५ च्या आयपीएल लिलावात युवराज सिंगसाठी दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाने सर्वात मोठी १६ कोटींची बोली लावली होती. युवराज सिंग हा आयपीएलच्या इतिहासातील एकमेव सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे.

  • 8/10

    वेस्ट इंडिजचा विस्फोटक फलंदाज निकोसल पुरनसाठी आयपीएल २०२३ मध्ये लखनौ सुपर जायंट्स संघाने १६ कोटींची तगडी बोली लावली होती आणि त्याला संघात सामील केले.

  • 9/10

    सर्वात महागड्या खेळाडूंच्या यादीत पॅट कमिन्स हा दोन वेळा असणारा एकमेव खेळाडू आहे. पॅट कमिन्सवर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएल २०२० च्या लिलावात १५.५० कोटींची बोली लावली होती.

  • 10/10

    भारताचा युवा विकेटकिपर फलंदाज इशान किशनकरता मुंबई इंडियन्स संघाने २०२२ च्या लिलावात १५.२५ कोटींची बोली लावली होती. इशान हा दुसरा सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. (सर्व फोटो सौजन्य-लोकसत्ता,एक्सप्रेस संग्रहित फोटो)

TOPICS
आयपीएल २०२५IPL 2025पॅट कमिन्समराठी बातम्याMarathi Newsयुवराज सिंगYuvraj Singh

Web Title: Ipl 2025 mega auction top 10 most expensive players in indian premier league auction history mitchell starc pat cummins yuvraj singh bdg

Terms & Condition Privacy Policy Contact Us
Copyright © 2025 The Indian Express [P] ltd. All Rights Reserved.